मोठी बातमी! मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा, अरविंद केंजरीवालांनी केला मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 06:16 PM2023-02-28T18:16:56+5:302023-02-28T18:17:59+5:30

​​​​​​Breaking Delhi ministers Manish Sisodia and Satyendar Jain Resign from their posts CM Arvind Kejriwal accepts their resignation : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना रविवारी संध्याकाळी सीबीआयकडून कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली होती.

breaking Delhi ministers Manish Sisodia Satyendar Jain resign from their posts CM Arvind Kejriwal accepts their resignation | मोठी बातमी! मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा, अरविंद केंजरीवालांनी केला मंजूर

मोठी बातमी! मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा, अरविंद केंजरीवालांनी केला मंजूर

googlenewsNext

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना रविवारी संध्याकाळी सीबीआयकडून कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली. अटकेपूर्वी सीबीआयने सिसोदिया  Manish Sisodia यांची सुमारे ८ तास चौकशी केली होती. या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले होते. दरम्यान, यानंतर मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि तुरुंगात असलेल्या Satyendar Jain सत्येंद्र जैन यांनी आपला राजीनामा दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा राजीनामा मजूर केला आहे.

सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री होते. याशिवाय अबकारी खातेही त्यांच्याकडे होते. सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारचे एकूण ८ विभाग होते. त्यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे अटकेनंतर तब्बल ९ महिन्यांनी सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.


सीबीआय कोठडीत रवानगी
मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने रविवारी सिसोदिया यांना अटक केली होती. मनीष सिसोदिया यांच्या सीबीआयच्या कोठडीच्या मागणीवरील निर्णय राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने राखून ठेवला होता. 

तत्पूर्वी, न्यायालयाने मंगळवारी कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर विचार करण्यास नकार दिला. सिसोदिया सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत. "आम्ही सध्याच्या परिस्थितीत कलम ३२ अंतर्गत याचिका विचारात घेण्यास इच्छुक नाही," असं मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने सिसोदिया यांच्या याचिकेवर म्हटल.

Web Title: breaking Delhi ministers Manish Sisodia Satyendar Jain resign from their posts CM Arvind Kejriwal accepts their resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.