Vivo सह चिनी मोबाइल कंपन्यांच्या ४४ ठिकाणांवर ED चे छापे, युपी-बिहारसह अनेक राज्यांत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 12:50 PM2022-07-05T12:50:29+5:302022-07-05T12:50:41+5:30
सक्तवसुली संचलनालयानं (ED) मंगळवारी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहारसह ४४ ठिकाणांवर छापे टाकले.
सक्तवसुली संचलनालयानं (ED) मंगळवारी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहारसह ४४ ठिकाणांवर छापे टाकले. ही छापे चिनी मोबाइल कंपनी Vivo आणि त्यांच्या संबंधित फर्म्सवर मनी लाँड्रिंग प्रकरणी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सीबीआय या प्रकरणी यापूर्वीपासूनच तपास करत आहे.
दरम्यान, चिनी मोबाइल कंपन्या भारतात इन्कम टॅक्स आणि ईडी यांच्या रडारवर आहेत. यापूर्वी तपास यंत्रणांनी FEMA अंतर्गत Xiaomi चे असेट्स सीज केले होते. परंतु नंतर कर्नाटक उच्च न्यायालयानं त्यावर स्थगिती दिली होती.
ED conducts raids at 44 places in money laundering probe against Chinese mobile manufacturing company Vivo & related firms:Officials
— Press Trust of India (@PTI_News) July 5, 2022
ईडीनं हे छापे मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत केली आहे. चीनची आघाडीची मोबाइल उत्पादक कंपी विवो आणि त्याच्याशी निगडीत काही अन्य कंपन्यांवर ४४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. मे महिन्यात ZTE Corp आणि Vivo Mobile Communivation Co. विरोधात कथितरित्या आर्थिक अनियमिततेबाबत तपास करण्यात आला होता.