Breaking: भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारला अपघात

By बाळकृष्ण परब | Published: December 30, 2020 04:30 PM2020-12-30T16:30:28+5:302020-12-30T16:32:03+5:30

Accident News : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या काराल आज राजस्थानमध्ये मोठा अपघात झाला. लालसोट-कोटा महामार्गावर सूरवाल ठाण्याजवळ हा अपघात झाला.

Breaking: Former India captain Mohammad Azharuddin's car crashes in Accident | Breaking: भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारला अपघात

Breaking: भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारला अपघात

Next


कोटा (राजस्थान) - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या काराल आज राजस्थानमध्ये मोठा अपघात झाला. लालसोट-कोटा महामार्गावर सूरवाल ठाण्याजवळ हा अपघात झाला. सुदैवाने अझरुद्दीन हे या अपघातातून बालंबाल बचावले. मोहम्मद अझरुद्दीन हे कुटुंबीयांसह रणथंबोर येथे येत असताना हा अपघात झाला.

भारताचे माजी क्रिकेटपटू असलेल्या मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारचा टायर निघाल्याने कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार रस्त्याशेजारी असलेल्या ढाब्यामध्ये घुसली. या अपघातातून अझरुद्दीन आणि त्यांचे कुटुंबीय बचावले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र ढाब्यावर काम करत असलेला चाळीस वर्षीय युवक जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. तर अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अझरुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या कारमधून हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले. तर पोलिसांनीही या अपघाताच्या चौकशीस सुरुवात केली आहे.

Web Title: Breaking: Former India captain Mohammad Azharuddin's car crashes in Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.