Breaking : दिल्लीत कपड्याच्या गोदामाला आग, 9 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 06:41 AM2019-12-23T06:41:31+5:302019-12-23T06:42:18+5:30
या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नवी दिल्ली - दिल्लीतील किरारी ग्राऊँड येथील गोडाऊनला आग भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून 9 जणांचा मृत्यू.झाल्याची माहिती आहे. येथील एका कपड्याच्या गोडाऊनला ही आग लागली आहे, तीन मजली इमारतीच्या खालील मजल्यावर हे कपड्याचे गोडाऊन होते. इमारतीला आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे.
या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या दुर्घटनेत 9 जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी आहेत. जखमींमध्ये 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरू आहे. तसेच, रुग्णवाहिकाही हजर झाली आहे.
Delhi: Three people have died and 10 have been injured after a fire broke out in a cloth godown in Kirari at around 12:30 am, today. The fire has been doused and the injured have been admitted to hospital. pic.twitter.com/VDDQW0STAk
— ANI (@ANI) December 22, 2019