बिना मेकअपचे पाहून ब्रेकअप
By admin | Published: March 2, 2017 04:29 AM2017-03-02T04:29:35+5:302017-03-02T04:29:35+5:30
मेकअपची मदत घेऊन काही काळ सुंदर दिसता येते. एका तरुणीच्या सौंदर्यावर भाळून एक जण तिच्या प्रेमातही पडला
मेकअपची मदत घेऊन काही काळ सुंदर दिसता येते. एका तरुणीच्या सौंदर्यावर भाळून एक जण तिच्या प्रेमातही पडला, परंतु मेकअप न करता बॉयफ्रेंडला भेटणे किती महागात पडू शकते, याचा अनुभव तिला आला. प्रेमात उतावीळ झालेल्या बॉयफ्रेंडने तिला एके दिवशी सरप्राइज द्यायचे ठरवले व तो सकाळीच तिच्या घरी दाखल झाला. मात्र, झाले भलतेच. तिला बिना मेकअपचे पाहून तो स्वत:च घाबरला व त्याच वेळी त्याने ब्रेकअप घेण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी त्याने तिला दूषणेही दिली.
तिचा बिना मेकअपचा चेहरा व मेकअपनंतरचा चेहरा यात एवढा
फरक का पडला, असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिकच आहे, तर ही तरुणी एका दुर्मीळ आजाराने बालपणापासून त्रस्त आहे. या आजारात चेहऱ्याची त्वचा फाटते व त्यातून रक्त बाहेर येत राहते. वय वाढले, तसा या आजाराचा त्रासही वाढला. हे झाकण्यासाठी ती दिवसातील अनेक तास खर्च करून मेकअप करते व सुंदर दिसते.