Breaking: मोदींचे मोठे सरप्राईज; सैन्याचा विश्वास वाढविण्यासाठी अचानक लेहला पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 10:25 AM2020-07-03T10:25:09+5:302020-07-03T10:39:25+5:30
खरेतर लष्करप्रमुख नरवणे यांच्यानंतर सीडीएस बिपिन रावत लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार होते.
नवी दिल्ली : भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केले आहे. गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर पाठीमागून हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
PM @narendramodi visited one of the forward locations in Nimu in Ladakh early morning today.
— BJP (@BJP4India) July 3, 2020
Located at 11K feet, this is among the tough terrains, surrounded by the Zanskar range and on the banks of the Indus.
He interacted with personnel of the Army, Air Force and ITBP. pic.twitter.com/hxoREuBvY0
खरेतर लष्करप्रमुख नरवणे यांच्यानंतर सीडीएस बिपिन रावत लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार होते. तेथे ते एलएसीवरील सुरक्षेचा आढावा घेणार होते. मात्र, मोदी यांनी अचानक भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बिपिन रावत देखील असून त्यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले. चीनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची विचारपूस करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मोदींनी लडाखमधील निमूमध्ये अचानक दिलेल्या भेटीनंतर आयटीबीपी, हवाई दलाच्या जवानांसोबत चर्चा केली. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 11,000 फुटांच्या उंचीवर आहे. सिंधू नदीच्या काठावर भारतीय जवानांचा कँप आहे.
मोदी चीनवर एकानंतर एक वार करत आहेत. भारताच्या सरकारी कंपन्यांना ४जी कंत्राटे रद्द करण्याचे आदेश, रेल्वेला चीनच्या कंपनीसोबतचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले होते. यानंतर 69 अॅपवर बंदी आणली होती. तसेच बुधवारी रशियाकडून तातडीने 33 लढाऊ विमाने मिळविण्यासाठी चर्चाही केली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने
सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती
लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज
गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार
FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच
OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले'
ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार