मोठी बातमी! तेलंगाणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर, प्रचार सभेवेळी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 02:51 PM2023-10-30T14:51:33+5:302023-10-30T14:53:37+5:30

प्रभाकर रेड्डी यांना तातडीने गजवेल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांना तिथून हैदराबादला हलविण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

Breaking News: BRS MP Kotha Prabhakar Reddy stabbed, Knife attack during election campaign Telangana | मोठी बातमी! तेलंगाणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर, प्रचार सभेवेळी घटना

मोठी बातमी! तेलंगाणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर, प्रचार सभेवेळी घटना

मेडकचे खासदार आणि दुब्बकाहून तेलंगाणा विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेले बीआरएसचे उमेदवार कोथा प्रभावर रेड्डी यांच्यावर प्रचाररॅलीमध्ये जिवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्यावर एका व्यक्तीने चाकू हल्ला केला आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. 

दौलताबाद मंडळातील सुरमपल्ली गावात खासदार प्रभाकर रेड्डी हे प्रचार करत होते. तेवढ्यात गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. यानंतर तिथे गोंधळ उडाला. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या त्या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी पकडले आणि चोप दिला आहे. तिथे पोलिसही असल्याने आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. 

प्रभाकर रेड्डी यांना तातडीने गजवेल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांना तिथून हैदराबादला हलविण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. अद्याप हल्लेखोराची माहिती मिळालेली नसून त्याची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहेत. तेलंगाणाचे अर्थ मंत्री टी हरीष राव यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते गजवेलकडे निघाले आहेत. 
 

Web Title: Breaking News: BRS MP Kotha Prabhakar Reddy stabbed, Knife attack during election campaign Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.