Amarnath Cave Cloudburst Update: अमरनाथमध्ये ढगफुटी; यात्रेकरूंवर संकट, ५ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:09 PM2022-07-08T19:09:09+5:302022-07-08T21:54:18+5:30
Amarnath cave Cloudburst Live: अमरनाथ गुहेच्या परिसरात ही ढगफुटी झाली आहे. यामुळे अनेक टेंट वाहून गेले आहेत.
अमरनाथ यात्रा खराब वातावरणामुळे काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. परंतू ती पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यातच आज अमरनाथ परिसरात मोठी ढगफुटी झाली. यामध्ये 13 यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
अमरनाथ गुहेच्या परिसरात ही ढगफुटी झाली आहे. यामुळे अनेक टेंट वाहून गेले आहेत. बचाव कार्य वेगाने सुरु करण्यात आले आहे. अधिकृत माहिती आलेली नाही. आजतकने पाच मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
अमरनाथ यात्रा आयोजकांनी देखील या घटनेची पुष्टी केली आहे. अमरनाथ गुहेजवळ १० ते १२ हजार भाविक आहेत. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्थानिकांनी अनेक जण वाहून गेल्याचे म्हटले आहे. भाविकांचे, सुरक्षा दलाचे आणि खानपानाचे टेंट वाहून गेल्याचे म्हटले आहे. जवळपास २५ तंबू वाहून गेले असून दोघांचा मृतदेह सापडला आहे.
#WATCH | J&K: Visuals from lower reaches of Amarnath cave where a cloud burst was reported. Rescue operation underway by NDRF, SDRF & other agencies
— ANI (@ANI) July 8, 2022
(Source: ITBP) pic.twitter.com/o6qsQ8S6iI
एनडीआरएफचे डीजी अतुल गढ़वाल यांनी सांगितले की, ढगफुटीची माहिती मिळाली आहे. एक टीम आधीपासून घटनास्थळी आहे. आणखी काही टीम तिथे रवाना करण्यात आल्या आहेत. किती लोकांचा मृत्यू झालाय हे आम्ही सांगू शकत नाही. कारण तिथे किती लोक उपस्थित होते, हे माहिती नाहीय.
अमरनाथ गुहेजवळ १० ते १२ हजार भाविक, मोठी ढगफुटी. https://t.co/CbvSFUBywh#amarnath#cloudburstpic.twitter.com/FQcy1pSes0
— Lokmat (@lokmat) July 8, 2022
हेल्पलाईन नंबर राज्य सरकार जारी करते. श्री अमरनाथ श्राइन बोर्ड नंबर जारी करेल. आम्ही त्यांच्यासोबत काम करू, असे ते म्हणाले.
#Cloudburst occurred at lower holy cave (#Amarnath) at around 1730 Hrs. Rescue teams rushed. pic.twitter.com/IvczAIHWJJ
— Ayushi Agarwal (@ayu_agarwal94) July 8, 2022