Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 07:46 AM2024-10-09T07:46:11+5:302024-10-09T07:55:18+5:30

जम्मू काश्मीर निवडणुकीचा निकाल लागत नाही तोच एक खळबळजनक बातमी येत आहे.

Breaking news: Kidnapping of two jawans by terrorists in Jammu Kashmir Anantnag; One escaped, Indian Army search operation start | Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

जम्मू काश्मीर निवडणुकीचा निकाल लागत नाही तोच एक खळबळजनक बातमी येत आहे. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी टेरिटोरिअल आर्मीच्या दोन जवानांचे अपहरण केले आहे. यामुळे सैन्य दलात खळबळ उडाली आहे. दोनपैकी एक जवान दहशतवाद्यांच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी ठरला आहे. 

जवानांच्या अपहरणानंतर सैन्य दलाने बंदोबस्त वाढविला असून परिसरात शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. अनंतनागच्या जंगल भागात या जवानांची तैनाती करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका करून आलेल्या जवानाकडून माहिती घेतली जात आहे. 

2020 मध्येही दहशतवाद्यांनी अशाचप्रकारचे कृत्य केले होते. टेरिटोरिअल आर्मीचे जवान शाकीर मंजूर वागे यांचे अपहरण केले होते. याच्या पाच दिवसांनी वागे यांच्या कुटुंबीयांना त्याचे कपडे पाठवून देण्यात आले होते. वागे हे दक्षिण काश्मीरच्या शोपियामधील हरमेन गावातील त्यांच्या घराजवळून बेपत्ता झाले होते. दहशतवाद्यांनी त्याची गाडी जाळली होती. यानंतर एक वर्षाने शाकीरचा मृतदेह सापडला होता. 

Web Title: Breaking news: Kidnapping of two jawans by terrorists in Jammu Kashmir Anantnag; One escaped, Indian Army search operation start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.