ब्रेक्रिंग बातमी: एअर इंडियाच्या विमानात मोबाईलचा स्फोट, फ्लाईटचं 'इमर्जन्सी लँडिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 05:16 PM2023-07-17T17:16:18+5:302023-07-17T17:16:40+5:30

विमानात १४० प्रवासी असल्याची माहिती

Breaking news mobile phone explodes in Air India flight so emergency landing took place | ब्रेक्रिंग बातमी: एअर इंडियाच्या विमानात मोबाईलचा स्फोट, फ्लाईटचं 'इमर्जन्सी लँडिंग'

ब्रेक्रिंग बातमी: एअर इंडियाच्या विमानात मोबाईलचा स्फोट, फ्लाईटचं 'इमर्जन्सी लँडिंग'

googlenewsNext

Air India, Mobile Blast: राजस्थानमधील उदयपूरमध्ये सोमवारी मोठी विमान दुर्घटना टळली. एअर इंडियाच्याविमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. प्राथमिक माहितीनुसार, प्रवाशाच्या मोबाईल फोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तांत्रिक तपासणीनंतर विमान दिल्लीला पाठवण्यात आले. फ्लाईटदरम्यानच फ्लाइटच्या आत असलेल्या मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. उदयपूरच्या दाबोक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करताना काही प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानाची व्यवस्थित तपासणी करण्यात आली. सर्वकाही बरोबर असल्याचे आढळल्यानंतर, विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केले.

फ्लाइटमध्ये 140 प्रवासी!

एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक-470 मध्ये हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानाने उदयपूरहून दिल्लीला दुपारी एक वाजता उड्डाण केले. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच प्रवाशाच्या मोबाईल फोनची बॅटरी फुटली. या फ्लाइटमध्ये एकूण 140 प्रवासी होते. फोनच्या बॅटरीचा स्फोट इतका जोरदार होता की फ्लाइटमध्ये बसलेले सर्व लोक घाबरले. विमानातील क्रू मेंबर्सनी प्रवाशांचा आढावा घेतला. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या उदयपूर ते दिल्ली विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. उड्डाणात प्रवाशाच्या मोबाईल फोनची बॅटरी फुटल्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उड्डाणाच्या वेळी प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला, त्यानंतर विमानाने सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

Web Title: Breaking news mobile phone explodes in Air India flight so emergency landing took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.