पाकिस्तानी नौदलाजवळ रहस्यमय पाणबुडी; भारतासाठी धोका वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 04:14 PM2020-04-16T16:14:56+5:302020-04-16T16:19:15+5:30

अमेरिकेच्या नेवी सीलसारखी ही काम करत असून, तिला पाकिस्तानी नेवी सील म्हटलं जातं. 

breaking pakistan navy seal have mysterious submarine big threat to india vrd | पाकिस्तानी नौदलाजवळ रहस्यमय पाणबुडी; भारतासाठी धोका वाढला

पाकिस्तानी नौदलाजवळ रहस्यमय पाणबुडी; भारतासाठी धोका वाढला

googlenewsNext

नवी दिल्लीः पाकिस्तान कायमच भारताविरोधात कुरापती करत असतो. नियंत्रण रेषांआडून दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचे कारस्थान करत असतो. आता पाकिस्तानकडून भारताला आणखी एक मोठा धोका असल्याचं उघड झालं आहे. पाकिस्तानचं नौदल हे एक घातक पाणबुडीचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत पाकिस्ताननं हे जगापासून लपवून ठेवलं होतं. ही रहस्यमय पाणबुडी पाकिस्तानातल्या कराची स्थित इक्बाल स्पेशल नेव्हल बेसवर तैनात आहे. पाणबुडीच्या खुलाशानंतर भारताची चिंता वाढली आहे. 

अमेरिकेतील फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचं नौदल या खतरनाक पाणबुडीचा वापर करत आहे. या पाकिस्तानी पाणबुडीचं नाव X-Craft आहे. पाकिस्ताननं ही पाणबुडी गुप्त ठेवली आहे. फोर्ब्सनुसार पहिल्यांदाच या गोपनीय पाणबुडीसंदर्भातील माहिती जगासमोर आली आहे. पाकिस्तानची ही पाणबुडी छोटी असली तरी खतरनाक आहे. ही पाणबुडी स्पेशल फोर्ससाठी तयार केली आहे. पाणबुडी ५५ फूट लांब आणि ७ ते ८ फूट रुंद आहे. पाणबुडी कुठे जाणार आणि कशा पद्धतीनं तिचा वापर करता येणार, याचा निर्णय पाकिस्तानातील स्‍पेशल सर्विस ग्रुप (SSG N) घेतो. अमेरिकेच्या नेवी सीलसारखी ही काम करत असून, तिला पाकिस्तानी नेवी सील म्हटलं जातं. 


पाकिस्तानची ही पाणबुडी इटलीहून खरेदी करण्यात येणाऱ्या पाणबुडींसारखीच आहे. इटलीनं दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी  हे तंत्रज्ञान ब्रिटिश नौदलाकडून खरेदी केलं होतं. पाकिस्तानच्या या अत्याधुनिक एक्सक्राफ्ट पाणबुडीची तुलना अमेरिकेच्या ड्राय कॉम्बॅट सबमरीनसोबत केली जाते. विशेष म्हणजे ही पाणबुडी पाकिस्तानातच बनवण्यात आल्याची चर्चा आहे. सॅटलाइटच्या माध्यमातून मिळालेल्या फोटोंनुसार ही पाणबुडी एकदम कमी पाण्यात जाते. जी जास्त करून पीएनएस नेवल बेसमध्ये असते. या पाणबुडीचं वर्षं २०१६मध्ये चित्र समोर आलं होतं. त्यामुळे ही पाणबुडी कोणत्या परिस्थिती हे अद्यापही माहिती नव्हतं. पाणबुडीची सध्या डागडुजी सुरू आहे. त्यामुळे पाणबुडीचं नाव समोर आलेलं नाही.

वर्ष 1971च्या युद्धातही आपण भारताला पराभूत करू, असं पाकिस्तानला वाटलं होतं. पाकिस्ताननं आधीपासूनच भारतासोबतच्या युद्धाची तयारी केली होती. पाकिस्तान आपला मित्र अमेरिकेकडून युद्धासाठी नवं-नवे शस्त्रास्त्र खरेदी करत होता. पण पाकिस्तानला भारताची सर्वात मोठी युद्धनौका असलेल्या आयएनएस विक्रांतची ताकदही माहिती होती. आयएनएस विक्रांतवर हल्ला करण्यासाठी पाकिस्ताननं गाझी या पाणबुडीला पाठवलं होतं. त्यावेळी भारतीय नौदलानं पाकिस्तानच्या डोळ्यात धुळफेक करत आयएनएस राजपूतला आयएनएस विक्रांतच्या जागेवर पाठवलं होतं. पाकिस्तानी पाणबुडी गाझीनं आयएनएस राजपूतवर हल्ला केला, तेव्हा आयएनएस राजपूतनंही पाकिस्तानची पाणबुडी गाझीला उद्ध्वस्त करून टाकलं होतं. 
 

Web Title: breaking pakistan navy seal have mysterious submarine big threat to india vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.