Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठा त्याग करणार; सोशल मीडियावर भूकंप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 09:18 PM2020-03-02T21:18:13+5:302020-03-02T22:23:04+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठी घोषणा करणार आहेत. याची कल्पना त्यांनी नुकतीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. कदाचित ते आभासी जगातून कायमचा संन्यास घेण्याच्या विचारात असल्याचे ट्विटवरून दिसत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ट्विटरवरील नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 50 मिलियन इतकी झाली. म्हणजेच 5 कोटींचा आकडा पार झाला आहे. ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलोअर्स असलेल्या राजकीय नेत्यांच्या लिस्टमध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानकावर आहेत. तर फेसबूकवरही त्यांचे 44 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर मोदींचे 35.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तसेच युट्युबवरील 4.5 दशलक्ष सबस्क्रायबर आहेत.
Narendra Modi यांच्या 'संन्यासा'च्या घोषणेनंतर राज ठाकरेंची 'ती' पोस्ट चर्चेत!
आज नरेंद्र मोदी यांनी मोठी अचंबित करणारी घोषणा केली आहे. येत्या रविवारी मोदी मोठा निर्णय घेणार असून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट सोडून देण्याच्या विचारात आहेत. याची माहिती लवकरच देण्याचेही मोदी यांनी सांगितले आहे. यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
Prime Minister Narendra Modi tweets, "This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted". pic.twitter.com/tqCIP1JMOQ
— ANI (@ANI) March 2, 2020
"या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील माझे सोशल मीडिया अकाउंट्स सोडून देण्याचा विचार आहे. आपणा सर्वांना सांगेन"., असे ट्विट मोदी यांनी केले आहे.
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2020
धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेख
नटसम्राटाचा सन्मान! डॉ. श्रीराम लागू यांच्या नावे पुरस्कार देणार
धक्कादायक! चोरटयांनी महिलेसह कार पळवली अन् तिच्यावर झाडली गोळी
ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; प्रमोद जठारांचा थेट आरोप