Breaking : रिलायन्सकडून कर्मचाऱ्यांची पगारकपात; मुकेश अंबानीनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 04:24 PM2020-04-30T16:24:12+5:302020-04-30T20:26:33+5:30

रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्य़ांना पगारकपातीचा फटका बसणार आहे. यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार १५ लाखांहून अधिक आहे त्यांच्या पगारामध्ये १० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे.

Breaking: Reliance announces salary cut on CoronaVirus; Mukesh Ambani is also unpaid hrb | Breaking : रिलायन्सकडून कर्मचाऱ्यांची पगारकपात; मुकेश अंबानीनी घेतला मोठा निर्णय

Breaking : रिलायन्सकडून कर्मचाऱ्यांची पगारकपात; मुकेश अंबानीनी घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे केलेल्या लॉकडाऊनचा फटका देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे. रिलायन्सने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपातीची घोषणा केली आहे. तर रिलायन्सचे मालक मुकेश अंबानींनी पगारच न घेण्याची घोषणा केली आहे. 


रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्य़ांना पगारकपातीचा फटका बसणार आहे. यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार १५ लाखांहून अधिक आहे त्यांच्या पगारामध्ये १० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. याशिवाय परफॉरमन्स आधारीत बोनसही यंदा टाळण्यात आला आहे. 
याशिवाय रिलायन्सचे बडे अधिकारी, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांच्या पगारावरही कात्री लावण्यात आली आहे. या साऱ्या वरिष्ठांना ३० ते ५० टक्के कपात सहन करावी लागणार आहे. तसेच खुद्द रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी एकही रुपया न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

हायड्रोकार्बन व्यवसायाला पेट्रोलियम पदार्थांची मागणी कमी झाल्याने मोठा फटका बसला आहे. कठीण परिस्थितीमुळे खर्चामध्ये कपात करणे अनिवार्य बनले आहे. यामुळे याकडे लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे कार्यकारी संचालक हितल मेस्वानी यांनी या पत्रकामध्ये म्हटले आहे. 


आज तिमाहीचा निकाल
कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की, कोरोना महामारीमुळे कंपनीला व्यवसायाची पूणर्बांधणी करण्याची संधी मिळाली आहे. २०१९-२० मध्ये कंपनीच्या संचालकांची एक बैठक झाली होती. यामध्ये ऑडिट अहवालावर चर्चा करण्यात आली होती. आज चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत. याआधीच कंपनीने पगार कपातीची घोषणा केली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

भन्नाट! जेवढे गाडीचे रनिंग, तेवढ्याचाच इन्शुरन्स भरा; नवी पॉलिसी आली

लॉकडाऊनमुळे पती गावी अडकला; विरहातून पत्नीने आत्महत्या केली

वडिलांच्या आजारपणाचा बनाव रचत अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीला गेला; लग्न करूनच परतला

CoronaVirus Lockdown जेवढा लॉकडाऊन वाढणार तेवढ्या जास्त नोकऱ्या जाणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा

CoronaVirus Lockdown सरकारी कंपनी 'धमाका' करणार; यंदा ६००० कर्मचाऱ्यांची बंपर भरती काढणार

Web Title: Breaking: Reliance announces salary cut on CoronaVirus; Mukesh Ambani is also unpaid hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.