Republic Day 2018 : राजपथावर बीएसएफ महिलांच्या चित्तथरारक कसरती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 01:14 PM2018-01-26T13:14:06+5:302018-01-26T14:06:29+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर महिला बीएसएफ जवानांना जबरदस्त कसरती केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला बीएसएफ जवानांनी अंगावर शहारे आणणा-या कसरती केल्या आहे.

The breathtaking exercise of BSF women on the Rajpath | Republic Day 2018 : राजपथावर बीएसएफ महिलांच्या चित्तथरारक कसरती 

Republic Day 2018 : राजपथावर बीएसएफ महिलांच्या चित्तथरारक कसरती 

Next

नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर महिला बीएसएफ जवानांना जबरदस्त कसरती केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला बीएसएफ जवानांनी अंगावर शहारे आणणा-या कसरती केल्या आहे. या महिला जवानांना मध्य प्रदेशमधल्या ग्वालियारजवळच्या टेकनपूर येथे प्रशिक्षण दिलं गेलं आहे. या महिलांच्या मोटारसायकलवरच्या कसरतींनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बीएसएफच्या महिला कसरती करत असताना अनेक नेत्यांनी जागेवर उभं राहून त्यांचा सन्मान केला आहे. त्यांच्या कसरती पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या चेह-यावरही हसू उमललं आहे. महिला जवानांच्या या चित्तथरारक कसरती पाहून सर्वांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. बीएसएफच्या या 26 जवान महिलांना अथक मेहनत घेऊन तयार करण्यात आलं आहे. बीएसएफच्या 106 महिलांच्या पथकाला सीमा भवानी असं नाव देण्यात आलं आहे. या महिलांनी 26 बुलेटवर सवारी करून कर्तब दाखवले आहेत. 
राजपथावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ
देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या प्रसंगी उपस्थित होते. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या आग्नेय आशियातील 10 देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. 

नवी दिल्लीत राजपथवर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथांचं संचलन सुरू आहे.  यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथात शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दर्शन घडलं. ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर उतरला होता.  छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ राजपथावर आल्यानंतर शिवसृष्टी पाहून खासदार संभाजीराजे यांनी उभे राहून 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा दिल्या. 

महाराष्ट्राच्या चित्ररथातील कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे. ज्या राजधानी दिल्लीने छत्रपतींच्या स्वराज्याला कायम कमी लेखलं, ज्या दिल्लीश्वरांशी झगडण्यात शिवरायांचं आयुष्य खर्ची पडलं त्याच दिल्लीच्या मातीत अनेक राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या पराक्रमाची कीर्ती सांगणारा हा चित्ररथ दिमाखात अवतरला. 

Web Title: The breathtaking exercise of BSF women on the Rajpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.