आंध्रात दिलेली लाच परत मिळणार
By admin | Published: June 9, 2017 03:52 AM2017-06-09T03:52:54+5:302017-06-09T03:52:54+5:30
आंध्र प्रदेशात सरकारी काम करून घेण्यासाठी लाच दिली असेल ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
अमरावती (आंध्र प्रदेश) : नुकतीच तुम्ही आंध्र प्रदेशात सरकारी काम करून घेण्यासाठी लाच दिली असेल ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही ११०० क्रमांकावर फोन करताच तुम्ही दिलेल्या लाचेची माहिती घेतली जाईल. ज्या सरकारी कर्मचाऱ्याने तुमच्याकडून लाच घेतली असेल कदाचित तोच तुमच्या दारात ते पैसे परत करायला आल्याचे तुम्हाला दिसेलही. मुख्यमंत्री एन. चंदूबाबू नायडू यांच्या सरकारच्या या दाव्यावर विश्वास ठेवला तर राज्यात हा महत्त्वाचा पायंडा ठरेल. संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत कर्नाटकनंतर आंध्र प्रदेश हे भ्रष्टाचारात दुसऱ्या स्थानावर आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी नायडू सरकारने केलेली उपाययोजना म्हणून याकडे बघितले जात आहे.
नायडू म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांत १२ सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांकडून घेतलेली लाच ज्याची त्याला परत करण्यात आली. कुर्नूल जिल्"ात पंचायत सचिवाने वेगवेगळ्या प्रकरणांत दहा लोकांकडून लाच घेतली होती.’ काही सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले की २५ मे रोजी सुरू झालेला ‘पीपल फर्स्ट’ हा तक्रार निवारण उपक्रम खूपच प्रभावीपणे काम करीत आहे. भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
सरकारचे संचार सल्लागार पी. प्रभाकर यांनी सांगितले की ‘११०० कॉल सेंटर चांगले काम करीत आहे. समाजातील कीड नाहीशी करण्याचा हा चांगला प्रयत्न आहे.