लाच मगणार्‍या वाहतूक पोलीसास न्यायालयीन कोठडी

By admin | Published: February 4, 2016 12:06 AM2016-02-04T00:06:48+5:302016-02-04T00:06:48+5:30

जळगाव : लाकडाच्या व्यापार्‍याकडून लाच मागणार्‍या पोलीस नाईक नटवर किशोर जाधव यांना न्या. के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयाने ३रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली.

Bribe transportation police police court | लाच मगणार्‍या वाहतूक पोलीसास न्यायालयीन कोठडी

लाच मगणार्‍या वाहतूक पोलीसास न्यायालयीन कोठडी

Next
गाव : लाकडाच्या व्यापार्‍याकडून लाच मागणार्‍या पोलीस नाईक नटवर किशोर जाधव यांना न्या. के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयाने ३रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली.
औरंगाबाद जिल्‘ातील कन्नड येथून मालेगावकडे लाकूड घेऊन जाणार्‍या लाकडाच्या व्यापार्‍याचे दोन ट्रक शहरातून जावू देण्यासाठी चाळीसगावचे पोलीस नाईक नटवर जाधव यांनी ८-८ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर १२ हजारात तडजोड झाली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. आरोपीला पकडण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी सापळा रचला. मात्र पैसे घेतांना जाधव घटनास्थळावरुन पळून गेले होते. या प्रकरणी नाशिक लाच लुचपत पथकाचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी चौकशीकरुन चाळीसगाव शहर पोलीसात ३१ जानेवरी रोजी गुन्हा दाखल केला. ३ रोजी आरोपीस अटककरुन न्या. के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. भारती खडसे यांनी काम पाहिले.
जिल्हा बँक मॅनेजरचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
जळगाव : खेडगाव ता. पाचोरा जिल्हा बँकेत झालेल्या एक कोटीच्या अपहार प्रकरणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक पंढरीनाथ पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर ४ रोजी निर्णय होणार आहे. सरकारतर्फे ॲड. केतन ढाके काम पाहतील.

Web Title: Bribe transportation police police court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.