शी जिनपिंग यांच्या सोबतच्या भेटीत PM मोदींनी उपस्थित केला LAC मुद्दा, दोन्ही नेत्यांमध्ये अशी झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 09:48 AM2023-08-25T09:48:48+5:302023-08-25T09:50:43+5:30

चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या सोबतच्या चर्चेदरम्यान पीएम मोदींनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भात (LAC) मुद्दा उपस्थित केला.

Brics leaders summit in johannesburg PM Modi Raises LAC Issue in Talks with Xi Jinping, Know about What Both Leaders Said | शी जिनपिंग यांच्या सोबतच्या भेटीत PM मोदींनी उपस्थित केला LAC मुद्दा, दोन्ही नेत्यांमध्ये अशी झाली चर्चा

शी जिनपिंग यांच्या सोबतच्या भेटीत PM मोदींनी उपस्थित केला LAC मुद्दा, दोन्ही नेत्यांमध्ये अशी झाली चर्चा

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदे व्यतिरिक्त चीनीचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबतही चर्चा केली. चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या सोबतच्या चर्चेदरम्यान पीएम मोदींनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भात (LAC) मुद्दा उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यारा संपण्यापूर्वी भारताच्या परराष्ट्र सचिवांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदे शिवाय, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि इतरही काही नेत्यांसोबत चर्चा केली.   शी जिनपिंग यांच्या सोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी एलएसीवरील न सुटलेल्या मुद्द्यांवर भारताची चिंता व्यक्त केली.

महत्वाचे म्हणजे, भारतात होणाऱ्या G20 सम्मेलनापूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात मे 2020 ला गलवानमध्ये हिंसक झडप झाली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी हे दोन्ही नेते इंडोनेशियाच्या बालीमध्ये G20 समिट दरम्यान भेटले होते. यादरम्यान पीएम मोदींनी द्विपक्षीय संबंध स्थिर करण्यावर भर दिला होता. 

चीनची प्रतिक्रिया -
याशिवाय, ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान भारत आणि चीन यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली? असे विचारले असता, राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी 23 ऑगस्ट 2023 रोजी ब्रिक्स शिखर सम्मेलनादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयालाने म्हटले आहे.

या दोन्ही नेत्यांनी सध्याचे भारत-चीन संबंध आणि समान हित संबंध्यांसंदर्भात गहन चार्चा केली. यावेळी, भारत आणि चीनचे संबंध सुधारणे हे दोन्ही देश आणि लोकांच्या समान हिताच्या दृष्टीने आणि जगातीक शांतता, स्थिरता आणि विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. दोन्ही देशांनी आपले द्विपक्षीय संबंध लक्षात घेऊन सीमा प्रश्न व्यवस्थित रित्या हाताळायला हवा, जेणेकरून संयुक्तपणे सीमा भागात शांतता राखली जाईल, यावर राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भर दिला.

 

 

Web Title: Brics leaders summit in johannesburg PM Modi Raises LAC Issue in Talks with Xi Jinping, Know about What Both Leaders Said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.