बाबो! हनीमूनच्या दिवशी नवरीने नवरदेवाला चपलेने चोपलं; सासरच्या मंडळींवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:24 AM2022-04-27T11:24:58+5:302022-04-27T11:26:24+5:30

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीने त्यांना चपलेने मारहाण केली. तर नवरीकडच्या मंडळींनी वेगळाच दावा केला आहे, सासरच्या लोकांनी नवरीला घराबाहेर काढल्याचं म्हटलं आहे. 

bride beat groom in suhagraat first wedding night now woman sit on dharna in sasuraal know strange incident | बाबो! हनीमूनच्या दिवशी नवरीने नवरदेवाला चपलेने चोपलं; सासरच्या मंडळींवर केले गंभीर आरोप

बाबो! हनीमूनच्या दिवशी नवरीने नवरदेवाला चपलेने चोपलं; सासरच्या मंडळींवर केले गंभीर आरोप

Next

नवी दिल्ली - लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. त्यानंतर लग्नानंतरच्य़ा पहिल्य़ा रात्रीला देखील महत्त्व असतं. पती-पत्नी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देतात. पण हनीमूनचा एक असा किस्सा समोर आला आहे जो समजल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. नवरदेवाकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे, की लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीने त्यांना चपलेने मारहाण केली. तर नवरीकडच्या मंडळींनी वेगळाच दावा केला आहे, सासरच्या लोकांनी नवरीला घराबाहेर काढल्याचं म्हटलं आहे. 

नवरी आपल्या आई-वडिलांसह नवरदेवाच्या घराबाहेर आता ठाण मांडून बसली आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिक, हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र नवरी आणि नवरदेवाकडचे लोक आपल्याआपल्या मुद्द्यांवर अडून असल्यामुळे प्रकरण आणखीच वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील एका सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याच्या घराबाहेर त्यांची सून तिच्या आई-वडिलांसोबत दोन दिवसांपासून धरणे आंदोलनासाठी बसली आहे. सुनेचा आरोप आहे की तिला सासरच्या घरी राहायचं आहे, पण सासरचे लोक तिला घरात ठेवायला तयार नाहीत. सुनेसोबतच तिचे आई-वडील आणि इतर नातेवाईकही धरणे आंदोलन करत आहेत. 

दुसरीकडे, निवृत्त रेल्वे अधिकारी विजय सिंह, त्यांची पत्नी चमेली देवी आणि मुलगा रोहित यांचा आरोप आहे की, धरणे आंदोलन करण्याच्या नावाखाली सून आणि तिच्या कुटुंबीयांनी घराचे वीज कनेक्शन तोडले आहे. पाणीपुरवठा बंद केला. हा वाद आणि प्रकरण पाटणाच्या राजीव नगर पोलीस ठाण्यातही पोहोचलं आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात आहे, पण एकही बाजू मागे यायला तयार नाही. स्थानिक लोकांसाठीही ही बाब अतिशय गुंतागुंतीची बनली आहे. हे प्रकरण मिटावे, अशी परिसरातील नागरिकांची इच्छा आहे, मात्र दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

2019 मध्ये स्मिताचं रोहितसोबत लग्न झालं होते. स्मिताचा आरोप आहे की, लग्नाच्या 4 महिन्यांनंतर सासरच्यांनी तिला जबरदस्तीने घराबाहेर काढलं. वडिलांनी हुंड्यात अनेक गोष्टी दिल्याचा तिचा दावा आहे. दुसरीकडे स्मिताच्या सासरच्या मंडळींचं म्हणणं आहे की हनीमूनच्या रात्रीच स्मिताने रोहित आणि त्याच्या मुलीला सँडलने मारहाण केली होती. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली. सध्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. स्थानिक लोकही हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bride beat groom in suhagraat first wedding night now woman sit on dharna in sasuraal know strange incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न