सप्तपदी घेणार इतक्यात मंडपातच झालं नवरीचं निधन, मेहुणीसोबत लावून दिलं नवरदेवाचं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:43 IST2021-05-27T13:32:11+5:302021-05-27T13:43:40+5:30
सुखी संसारचे स्वप्न रंगवलेल्या नवरीचा लग्नातच मृत्यू झाल्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.

सप्तपदी घेणार इतक्यात मंडपातच झालं नवरीचं निधन, मेहुणीसोबत लावून दिलं नवरदेवाचं लग्न
उत्तर प्रदेशच्या इटावामधून एक अशी घटना समोर आली जिथे धूम-धडाक्यात सुरू असलेल्या लग्नातच नवरीचा मृत्यू झाला. त्यानंतर मंडपात एकच खळबळ उडाली. लग्नाचे रितीरिवाज पूर्ण होणार होते अचानक सप्तपदीच्या आधी नवरीच्या हृदयाचे ठोके थांबल्याने तिचा मृत्यू झाला.
इटावाच्या समसपूरमध्ये सुरू असलेल्या लग्नात ही घटना घडली. नवरीकडील नातेवाईक महेश चंदने सांगितलं की, मंगळवारी २५ मे रोजी त्याची बहीण सुरभीचं लग्न मंजेश गावातील चितभवनसोबत धूम-धडाक्यात सुरू होतं. वरात आल्यावर नवरदेवाचं आणि पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. रितीरिवाज सुरू झाले. (हे पण वाचा : धूम-धडाक्यात सुरू होतं लग्न, तेव्हाच मंडपात तरूणाची पहिली पत्नी पोहोचली; मग झालं असं काही....)
रात्री साधारण साडे आठ वाजता सुरू झालेल्या रितीरिवाज वरमाला, भांग भरणे, इत्यादी रिवाज पूर्ण झाले होते. सप्तपदीसाठी नवरी आणि नवरदेवाकडील लोक तयारी करत होते. अशात अचानक साधारण अडीच वाजता नवरी बेशुद्ध पडली. नवरी बेशुद्ध पडताच लग्न घरात एक खळबळ उडाली.
कसं तरी नवरीला गावातील एका खाजगी डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरने चेक केलं तर नवरीच्या हृदयाचे ठोके बंद पडल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं. यानंतर दोन्ही परिवाराचा आनंद दु:खात बदलला. (हे पण वाचा : लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन, अधिकाऱ्यांनी धाड टाकली तर नवरीला सोडून पळाला नवरदेव)
लग्नासाठी आलेल्या नातेवाईक आणि नवरदेवाकडील लोकांनी चर्चा करून सर्वांच्या सहमतीने मृत मुलीच्या छोट्या बहिणीसोबत नवरदेवाचं लग्न लावून देण्यात आलं. यादरम्यान मृत तरूणीचा मृतदेह घरातील एका रूममध्ये ठेवण्यात आला होता. नवरीची पाठवणी केल्यावर मृत तरूणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.