हार घालताना नवरीला भोवळ आली; मांडवात एक विचित्र अफवा पसरली अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 14:11 IST2021-06-18T14:09:01+5:302021-06-18T14:11:05+5:30
हार घालताना नवरी चक्कर येऊन कोसळली; नंतर मांडवात घडला धक्कादायक प्रकार

हार घालताना नवरीला भोवळ आली; मांडवात एक विचित्र अफवा पसरली अन् मग...
कनोज: उत्तर प्रदेशच्या कनोजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक लग्न समारंभ सुरू असताना वधूला अचानक भोवळ आली. वराच्या गळ्यात हार घालतेवळी ती अचानक कोसळली. यानंतर वराच्या मेहुण्यानं एक अफवा पसरवली. त्यानंतर नवऱ्या मुलाकडच्यांनी वरात लग्न रद्द केलं. तर मुलीकडच्यांनी सासरच्या मंडळींवर अधिक हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे.
मैनपुरीतील नवीगंजमध्ये वास्तव्यास असलेले धर्म सिंह कठेरिया बुधवारी रात्री सिकंदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या मुलीच्या घरी वरात घेऊन आले. मुलीचं लग्न होत असल्यानं घरात आनंदाचं वातावरण होतं. हार घालताना प्रचंड उकाड्यामुळे वधूला चक्कर आली. ती स्टेजवर कोसळली. हे पाहून वराचा मेहुणा भडकला. आजारी आणि वेड्या मुलीशी लग्न लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यानं केला.
मुलीला भूतबाधा झाल्याचा दावा वराच्या मेहुण्यानं केला. त्यानंतर मुलानं मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला. वर आणि वरात तिथून निघून गेले. वरात माघारी गेल्याची माहिती मुलीकडच्यांनी पोलिसांना दिली. मुलाकडची मंडळी अधिक हुंडा मागून आपल्याला आणि कुटुंबाला त्रास देत असल्याचा आरोप त्यानं केला. लग्नात मुलाला देण्यासाठी टीव्ही, फ्रीज, कपाट, दुचाकी आणि बेडची व्यवस्था केली. मात्र मुलाकडची मंडळी लग्नाच्या दिवशी आणखी ५ लाखांची मागणी करू लागली, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला.