लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 03:29 PM2020-08-11T15:29:27+5:302020-08-11T15:56:36+5:30

देशातील काही राज्यात पावसाने थैमान घातले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारच्या पुरात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. 

bridegroom reached venue to make marriage after crossing flood in bihar | लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात

लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशातील काही राज्यात पावसाने थैमान घातले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी मुसळधर पाऊस पडत असून नद्यांना पूर आला आहे. अशा पूर परिस्थितीत विवाहसोहळ्याचं आयोजन केल्याचं जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो खरं आहे. बिहारच्या पुरात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. 

बिहारच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीत लोकांचा उत्साह काही कमी झालेला नाही. पुरामध्ये झालेल्या एका लग्नाचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. मुझफ्फरपूरच्या सकरा परिसरात हा समारंभ पार पडला. यामध्ये नवरदेव बोटीतून आला. तर इतर नातेवाईकांनीही चक्क गुडघाभर पाण्यातून प्रवास करत हजेरी लावली. 

मिळालेल्या माहितीनुसार, या अनोख्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. समस्तीपूरच्या मुसापूर गावातून निघालेली वरात वाजत गाजत मुझफ्फरपूरच्या सकरा गावात पोहोचली. पावसामुळे गावात पाणीच पाणी होते. मात्र पाण्यातच ठरलेल्या वेळनुसार समारंभ संपन्न झाला. गावकऱ्यांनी पाहुणे मंडळींना सुरक्षित ठिकाणी पोहचण्यासाठी मदत केली. याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी एका लग्नसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये लग्नात चक्क नवरी लॅपटॉप घेऊन काम करताना दिसली. खरंतर लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे सर्वच जण तो दिवस आनंदाने साजरा करतात. मात्र व्हिडीओत नवरी कामात मग्न असलेली पाहायला मिळाली होती. ट्विटरवर एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून तो अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाला. या व्हिडीओवर लोकांनी मजेशीर कमेंटही केल्या होत्या. 

महत्त्वाच्या बातम्या

कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो

बापरे! बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले

यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव

'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका 

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

तैवानच्या हद्दीत घुसले, मिसाईल डागलेली पाहून चिनी वैमानिक पळाले

शिकागोमध्ये हजारो लोकांनी केली लूटमार; 100 जणांना अटक, 13 अधिकारी जखमी

"देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण"

Web Title: bridegroom reached venue to make marriage after crossing flood in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.