पुरात पूल गेला वाहून
By admin | Published: August 13, 2015 11:24 PM2015-08-13T23:24:05+5:302015-08-13T23:24:05+5:30
पुरात पूल गेला वाहून
Next
प रात पूल गेला वाहून मुसळधार पावसामुळे नरखेड तालुक्यातील पिपळा (केवलराम) परिसरातील नाल्यांना पूर आला होता. त्यातच या शिवारातून वाहणाऱ्या लेंडी नाल्यावरील पूल पुरात वाहून गेला. हा नाला शेतात जाणाऱ्या मार्गावर असून, शेतकऱ्यांच्या सोईसाठी यश नाल्यावर सिमेंटच्या पायल्यांचा पूल बांधण्यात आला होता. हा पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव (धुरखेडा) लगतच्या सप्तधारा नदीवर नव्यानेच पूल बांधण्यात आला. मात्र नदीला आलेल्या पुरामुळे या पुलावरील कठडे वाहून गेले. त्यामुळे हा पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. -------रामटेक तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीभोवती वर्षभरापूर्वी संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. ती मुसळधार पावसामुळे कोसळली---------------हेमराज ठाकरे, शिंदुलाल ठाकरे, शुभम ठाकरे, शुभ्रता ठाकरे, हेमलता ठाकरे, क्रिष्णा ठाकरे, दुर्गेश डेहरिया, धनिराम, सियाराम, द्रौपदी, राजकन्या, नितीन डेहरिया, ओमकार, जैन कुमार