संक्षिप्त

By admin | Published: February 21, 2015 12:49 AM2015-02-21T00:49:50+5:302015-02-21T00:49:50+5:30

काश्मीरच्या नाल्यात

Brief | संक्षिप्त

संक्षिप्त

Next
श्मीरच्या नाल्यात
सापडली स्फोटके
जम्मू : जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कटरा भागात एका नाल्यात स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली़ कटराच्या पैंथाल नाल्यातून गुरुवारी चार डिटोनेटर, जिलेटीनच्या कांड्या आणि काही तारा सापडल्या़ नजीकच्या खाण कारखान्यात ही स्फोटके वाहत नाल्यात आल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे़

कार झाडावर धडकली
सात जणांचा मृत्यू
अहमदाबाद : जिल्ह्याच्या तसादी गावात शुक्रवारी सकाळी एक कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला़ मृतांमध्ये दोन बालके आणि चार महिलांचा समावेश आहे़ कारमध्ये १३ जण होते़ यापैकी कारचालकासह सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला़


वाराणसीच्या विधवांनी
खेळली गुलाल व फुलांची होळी
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात विधवांनी प्रथापरंपरा झुगारत रंगांची उधळण करीत होळी खेळली़ विधवा होळी खेळू शकत नाहीत, या कु्रप्रथेविरुद्ध शेकडो विधवा येथील अस्सी घाटावर एकत्र आल्या आणि त्यांनी गुलाल व फुलांची होळी खेळली़

मुल्लापेरियार धरणाबाबत
केंद्राकडून मागितले स्पष्टीकरण
नवी दिल्ली : केरळमधील मुल्लापेरियार धरणाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(सीआयएसएफ) तैनात करा, अशी विनंती करणाऱ्या तामिळनाडू सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितले़ तूर्तास केरळ सरकारकडे या धरणाच्या सुरक्षेचा जिम्मा आहे़

प्रशांत भूषण यांच्या
याचिकेवर केंद्रास नोटीस
नवी दिल्ली : दहा वर्षांच्या पूर्ण वैधतेसह आपल्या पासपोर्टच्या नूतनीकरणाबाबत आदेश द्यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्रास नोटीस बजावले़ या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ मार्चला होईल़ भूषण यांच्याविरुद्ध प्रलंबित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पासपोर्टचे केवळ एका वर्षांसाठी नूतनीकरण करण्यात आले होते़

शीखविरोधी दंगलीप्रकरणी
आरोपींची मागणी फेटाळली
नवी दिल्ली: सन १९८४ च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणाची सुनावणी पूर्व दिल्लीच्या कडकड्डूमा जिल्हा न्यायालयातून रोहिणी जिल्हा न्यायालयात स्थानांतरित करा, ही तीन आरोपींची मागणी दिल्लीच्या एका न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली़ ब्रह्मानंद गुप्ता, पीरिया आणि वेदप्रकाश या दंगलीतील तीन आरोपींनी क्षेत्राधिकाराच्या आधारावर ही याचिका दाखल केली होती़

Web Title: Brief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.