संक्षिप्त

By Admin | Published: February 21, 2015 12:50 AM2015-02-21T00:50:43+5:302015-02-21T00:50:43+5:30

काश्मीरच्या नाल्यात

Brief | संक्षिप्त

संक्षिप्त

googlenewsNext
घरांना विटा, ना दुमजली इमारत
फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील प्रसिद्ध शहामियॉ बाबा यांच्या कुशीत वसलेले पीरबावडा व आडगाव (खुर्द) ही दोन गावे जगावेगळी म्हणून ओळखली जातात. येथील घरे विटांची नसून गावात दुमजली इमारत बांधणे चालत नाही. घराच्या भिंतींना चुना चालत नाही. लग्नसराईचा कारभार उरूस उत्सवानंतरच ठरवण्यात येतो.
पीरबावडा परिसरातील जुन्या जाणकार लोकांच्या मतानुसार सुमारे ५०० वर्षापूर्वी हजरत शहामियॉ बाबा आपल्या १३०० पिरांच्या पालख्या सोबत अखाती देशांमधून आले. ते १३०० पालख्यांचे सरदार (प्रमुख) होते. पीरबावडा येथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर हजरत शहामियॉ बाबा यांनी सर्व पालख्यांच्या प्रमुखांचा बटवडा (वाटण्या) केला. त्यांनी सर्व पीरांना (संत) जागा निश्चित करून चारही दिशांना त्यांना पाठवले व ते स्वत: पीरबावडा येथेच राहिले. अनेक वर्ष त्यांनी विविध चमत्कार दाखवून परिसरातील लोकांचे दु:ख दूर केले. अनेक गावातील लोक त्यांच्याकडे अडचणी मांडत असत. दररोज समस्या सोडवण्यासाठी दरबार भरत होता. ईश्वरी शक्तीचा वापर त्यांनी सकारात्मक कामासाठी केला. तेव्हापासून परिसरातील नागरिक त्यांना ग्रामदैवत मानू लागले. त्यानंतर पंचक्रोशीतील नागरिकांनी या ठिकाणी दर्गा बनवला. या दर्ग्यावर दरवर्षी उरूस भरतो.

शहामियॉ बाबा यांची ख्याती -
शहामियॉ बाबा यांनी केलेल्या उपदेशानुसार गावातील घरे बांधण्यासाठी विटांचा वापर केला जात नाही. दोन्ही गावात एकही दुमजली इमारत नाही. घरांच्या भिंतींना चुना लावला जात नाही. शेकडो वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. पूर्वी केवळ माती व माळवदाची (लाकडी) घरे होती. सध्या मात्र विटांऐवजी सिमेंटच्या गट्टूचा भिंतीसाठी वापर केला जात आहे. आजच्या विज्ञान युगातही दोन्ही गावातील नागरिकांची शहामियॉ बाबा यांच्यावर अमाप श्रद्धा असून दरवर्षी उरूस उत्सवात भाग घेतात. विशेष म्हणजे गाव सोडून इतर ठिकाणी नोकरीनिमित्त व कामानिमित्त स्थलांतरित झालेले, गावच्या सासरी गेलेल्या लेकी, नातेवाईक न चुकता शहामियॉ बाबा यांच्या दरबारात दर्शनासाठी येतात.

Web Title: Brief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.