थोडक्यात

By admin | Published: August 7, 2015 12:06 AM2015-08-07T00:06:57+5:302015-08-07T00:06:57+5:30

थोडक्यात

Briefly | थोडक्यात

थोडक्यात

Next
डक्यात

पोलीस ठाण्यांमध्ये गटारीला बंदी
मुंबई - शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गटारी साजरी करू नका, असे आदेश सहआयुक्त देवेन भारती यांनी जारी केले आहेत. हददीत घडलेल्या अपघातांमध्ये ठार झालेल्यांच्या नावाने कोंबडी, बकर्‍याचा बळी देण्याची प्रथा काही वर्षांपुर्वी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये रूढ झाली होती. गटारी अमावस्येला हा बळी दिला जात होता. तसेच त्यातूनच गटारीही साजरी होत होती. मात्र प्राण्यांची कत्तल ही कायदेशीर गुन्हा असून पोलीस ठाण्यांमध्ये असा प्रकार घडल्यास प्राणीमित्र आक्षेप घेऊ शकतात, अशा सूचना भारती यांनी पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.

युसूफ पुनावाला गजाआड
मुंबई - बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशी बनावटीच्या महागडी वाहने देशात आयात करणार्‍या युसूफ पुनावाला याला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी गजाआड केले. दुबई दडून बसलेल्या पुनावालाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. दुबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली केले. या प्रकरणी अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त प्रविण पडवळ यांनी दिली.

Web Title: Briefly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.