थोडक्यात वृत्त
By admin | Published: December 8, 2015 01:52 AM2015-12-08T01:52:10+5:302015-12-08T01:52:10+5:30
हर्षवर्धन प्रशालेचे विज्ञान प्रदर्शनात यश
Next
ह ्षवर्धन प्रशालेचे विज्ञान प्रदर्शनात यशसोलापूर: हिप्परगा येथील हर्षवर्धन प्रशालेने विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या ‘खेळातून शिक्षण’ या शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांक मिळाला. बालभारती विद्यालय, कुमठा नाका येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या साहित्यात चुंबकीय, विद्युत, ध्वनी, ऊर्जा, बल या संकल्पनेच्या स्पष्टीकरणासाठी शिक्षक संजय जवंजाळ यांनी विविध प्रतिकृती तयार केल्या होत्या. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तु. ना. लोंढे, गरड, शं. गो. गंभीरे, मुख्याध्यापक उ. शं. ढेकळे, ब. मा. राऊत यांनी कौतुक केले.ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर संमेलनसोलापूर: स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी ड्रीम फाउंडेशनतर्फे दुसरे ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी मनपा आयुक्त विजय काळम-पाटील यांची नियोजन समिती बैठकीत निवड झाली. यावेळी कार्याध्यक्षा संगीता पाटील, सतीश पाटील, निमंत्रक काशिनाथ भतगुणकी, विलास हरवाळकर, बसवराज हिरोळे, रवी वाघमोडे, नुरंदया स्वामी, अरविंद टेके, प्रकाश कोळी, गुरुबाळ तावसे आदी उपस्थित होते. विडी उद्योग वाचवण्यासाठी पवारांना साकडेसोलापूर: केंद्र शासनाच्या जाचक अटीतून विडी उद्योगाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डा. गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घालण्यात आले. यावेळी पवारांनी पंतप्रधान, कामगार मंत्र्यांशी चर्चा करुन हा उद्योग टिकवण्यासाठी प्रय} करण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. गोवर्धन सुंचू, रवींद्र सरगम, सतीश दासरी, नागनाथ भंडारी, विनायक र्शीगादी, अंबिका गादास, देवम्मा यादव, सविता गादास, सिद्धव्वा येमूल, विजय आडेप आदींसह विडी कामगार उपस्थित होते.नवयुग ग्रुपतर्फे 63 जणांचे रक्तदानसोलापूर: शेळगी येथील नवयुग सरगम फ्रेंड्स व साखरपेठ मित्र परिवाराच्या वतीने रविवारी रक्तदान शिबीर पार पडले. संस्थेच्या वतीने हे 63 वे रक्तदान शिबीर होते. या शिबिरात 105 जणांनी रक्तदान केले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, नगरसेवक अमर पुदाले, कुमुद अंकाराम, राजू हौशे?ी, राजू माने, अशोक निंबर्गी, आनंद तालीकोटी, गणेश पवार, कल्लेश गडवीर, सिद्धू स्वामी, हरीश यरगल, विक्रम यरगल, अमर स्वामी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.