कोपर्डी येथील पीडित कुटुंबाने घेतली उज्ज्वल निकम यांची भेट भय्यूजी महाराजही उपस्थित : सव्वातास चर्चा, न्याय मिळण्याची मागणी
By admin | Published: September 13, 2016 11:59 PM2016-09-13T23:59:15+5:302016-09-13T23:59:15+5:30
जळगाव : कोपर्डी (नगर) येथील पीडित मुलीची आई, बहीण व मामा यांच्यासह भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे सव्वातास चर्चा झाली.
Next
ज गाव : कोपर्डी (नगर) येथील पीडित मुलीची आई, बहीण व मामा यांच्यासह भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे सव्वातास चर्चा झाली. त्यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील भय्यूजी महाराज व ॲड.निकम यांनी सांगण्याबाबत नकार दिला. परंतु पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत अधिकचे बोलणे योग्य होणार नाही, असे भय्यूजी महाराज यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भय्यूजी महाराज व कोपर्डी येथील पीडित मुलीचे नातेवाईक ॲड.निकम यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यानंतर त्यांची ॲड.निकम यांच्यासोबत बंदद्वार चर्चा झाली. मी पीडितेचा भाऊ म्हणून आलोनिकम यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर भय्यूजी महाराज यांनी पत्रकारांशी निकम यांच्या निवासस्थानी वार्तालाप केला. त्यात ते म्हणाले, कोपर्डी येथील पीडितेचा भाऊ म्हणून मी निकम यांची भेट घेण्यासाठी आलो. निकम यांना भेटण्यासाठी पीडितेच्या कुटुंबतील कोण कोण आले हे सांगण्यास मात्र भय्यूजी महाराज यांनी नकार दिला. पीडितेेचे कुटुंबीय भय्यूजी महाराज यांच्यासोबतपुढे भय्यूजी महाराज म्हणाले, कोपर्डी येथील पीडित मुलीचे कुटुंबीयांना असुरक्षित वाटत होते. त्यांना स्वास्थ्याची गरज होती. पीडितेचे कुटुंबीय माझ्यासोबत राहतात. या कुटुंबाला बाहेरच्या जगाची माहिती नाही. त्यांची असुरक्षितता दूर व्हावी, सामान्य वातावरण त्यांच्यात असावे, असे मला वाटते. कोपर्डीच्या घटनेसारखा प्रसंग माझी बहीण, मुलगी यांच्याबाबत घडला असता तर काय झाले असते हा विचार मी करतो. कुठल्याही अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त कुटुंबाला मदत करण्याची आपली भूमिका, वृत्ती आहे, असेही भय्यूजी महाराज यांनी स्पष्ट केले. सायबर सेक्स संकल्पना आणून नियंत्रण करावेलैंगिक शिक्षणाची गरज विद्यार्थ्यांना नाही. कारण बलात्कार करणार्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फारशी नाही. परंतु पोर्न बेवसाईटबाबत नियंत्रण व्हावे. सायबर सेक्स संकल्पनेतून या पोर्न वेबसाईटवर नियंत्रण करता येईल, असा दावा भय्यूजी महाराज यांनी केला.कोपर्डी येथे विद्यार्थिनींसाठी चार वाहनेकोपर्डी येथील घटनेनंतर मी तेथे विद्यार्थिनींची ने-आण करण्यासाठी चार वाहने दिली. मेसेज अलर्टस्ची संकल्पना सुरू केली. सीसीटीव्हीची व्यवस्था करून दिल्याचेही भय्यूजी महाराज म्हणाले.