ब्रिजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता; अटक होईपर्यंत कुस्तीपटू आंदोलनावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 09:10 AM2023-04-29T09:10:42+5:302023-04-29T09:20:16+5:30
जोपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही तोपर्यंत कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत.
भारतीय कुस्तीचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता अटक होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. दरम्यान जोपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही तोपर्यंत कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत.
एफआयआर दाखल करण्यापूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पोलिस सर्व पीडित कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणार आहे. तसेच या प्रकरणी पोलिस संबंधित पुरावे गोळा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Six days after resumption of wrestlers' protest, Delhi Police register two FIRs against WFI chief
— ANI Digital (@ani_digital) April 28, 2023
Read @ANI Story | https://t.co/fG1a9jmDyi#WFI#WrestlersProtest#brijbhushansaransingh#BajrangPunia#SakshiMalikpic.twitter.com/bjkkNVivlS
भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याचे आश्वासन दिले होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर एसजी तुषार मेहता यांनी दिल्ली पोलीस आजच एफआयआर दाखल करतील असे म्हणाले होते.
सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर कुस्तीपटूंनी पत्रकार परिषदेत ब्रिजभूषणला अटक होईपर्यंत आपले आंदोलन संपणार नसल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ब्रिजभूषण सिंह यांना सर्व पदांवरून काढून टाकावे, ते त्यांच्या पदांचा गैरवापर करू शकतात. आमचा कोणत्याही समिती किंवा समिती सदस्यावर विश्वास नाही, असे विनेश फोगाट म्हणाली होती.