ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांची साबरमती आश्रमाला भेट; चरख्यावर केली सूत कताई; प्रथमच एका ब्रिटिश पंतप्रधानांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 08:09 AM2022-04-22T08:09:08+5:302022-04-22T08:09:54+5:30
जाॅन्सन यांचा अभिप्राय : या असाधारण व्यक्तीच्या आश्रमात येणे आणि विश्वाला चांगले बनविण्यासाठी कशा प्रकारे सत्य आणि अहिंसेच्या साेप्या सिद्धांतावर भर दिला, हे समजून घेणे साैभाग्यपूर्ण आहे, असा अभिप्राय बाेरिस जाॅन्सन यांनी आगंतुक पुस्तिकेमध्ये नाेंदविला.
अहमदाबाद : महात्मा गांधी हे असाधारण व्यक्ती हाेते. विश्वाला अधिक चांगले बनविण्यासाठी त्यांनी सत्य आणि अहिंसेवर भर दिला, असे गाैरवाेद्गार ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांनी काढले. ते दाेन दिवसांच्या भारत दाैऱ्यावर असून, त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. या आश्रमाला भेट देणारे ते पहिलेच ब्रिटिश पंतप्रधान ठरले आहेत.
बाेरिस जाॅन्सन यांचे गुरुवारी सकाळी अहमदाबादमध्ये आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. आश्रमात महात्मा गांधींचे वास्तव्य हाेते ते हृदय कुंज आणि त्यांच्या अनुयायी मीराबेन यांच्या मीरा कुटीर येथेही त्यांनी भेट दिली. जाॅन्सन यांनी चरख्यावर सूत कताईदेखील केली. साबरमती आश्रमातर्फे त्यांना दाेन पुस्तके भेट देण्यात आली. त्यात ‘गाईड टू लंडन’ या अप्रकाशित पुस्तकाचाही समावेश आहे. लंडनमध्ये कसे वास्तव्य करावे, याबाबत महात्मा गांधींच्या काही सूचना त्यात आहेत, तर मीराबेन यांची आत्मकथा असलेले ‘द स्पिरिट्स ऑफ पिल्ग्रीमेज’ या दुसऱ्या पुस्तकाचा समावेश आहे. बाेरिस जाॅन्सन हे आज, शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेणार आहेत.
जाॅन्सन यांचा अभिप्राय : या असाधारण व्यक्तीच्या आश्रमात येणे आणि विश्वाला चांगले बनविण्यासाठी कशा प्रकारे सत्य आणि अहिंसेच्या साेप्या सिद्धांतावर भर दिला, हे समजून घेणे साैभाग्यपूर्ण आहे, असा अभिप्राय बाेरिस जाॅन्सन यांनी आगंतुक पुस्तिकेमध्ये नाेंदविला.