ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन २१ एप्रिल रोजी भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:48 AM2022-04-18T10:48:53+5:302022-04-18T10:49:23+5:30
ब्रिटन पंतप्रधानांच्या अधिकृत कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. जॉन्सन यांचा भारत दौरा २१ एप्रिल रोजी अहमदाबादेतून सुरू होईल. यावेळी भारत आणि ब्रिटन यांच्यात प्रमुख उद्योगांबाबत घोषणा होईल.
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे २१ एप्रिल रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. अहमदाबादेत त्यांचे आगमन होईल. गुजरातचा दौरा करणारे ते ब्रिटनचे पहिलेच पंतप्रधान असतील.
ब्रिटन पंतप्रधानांच्या अधिकृत कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. जॉन्सन यांचा भारत दौरा २१ एप्रिल रोजी अहमदाबादेतून सुरू होईल. यावेळी भारत आणि ब्रिटन यांच्यात प्रमुख उद्योगांबाबत घोषणा होईल. त्यानंतर जॉन्सन हे २२ एप्रिल रोजी मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होतील. संरक्षण, आर्थिक सहकार्य आदी विषयांवर ते चर्चा करतील. भारत आणि ब्रिटन यांच्यात सुरू झालेली मुक्त व्यापार करार (एफटीए) चर्चा पुढे चालू ठेवण्यासाठीही हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. जॉन्सन यांनी म्हटले आहे की, रोजगारनिर्मितीसह आर्थिक विकासावर, ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षणाच्या मुद्द्यावर यात चर्चा होईल. हुकूमशाही वृत्तीमुळे शांतता भंग होत आहे.
त्यामुळे मित्र देशांची एकजूट होण्याची गरज आहे. एक प्रमुख आर्थिक शक्ती आणि सर्वात मोठा लोकशाही देश असलेला भारत अनिश्चिततेच्या या काळात ब्रिटनसाठी एक महत्त्वपूर्ण सहकारी ठरणार आहे. या दौऱ्यात असा करार होऊ शकतो, जेणेकरून २०३५ पर्यंत ब्रिटनचा एकूण वार्षिक व्यापार वाढून २८ अब्ज पाउण्डपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.