ब्रिटनच्या पंतप्रधान 6 नोव्हेंबरला येणार भारत दौ-यावर
By admin | Published: October 16, 2016 05:40 PM2016-10-16T17:40:43+5:302016-10-16T17:40:43+5:30
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेमा मे यांचा भारत दौ-याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. 6 ते 8 नोव्हेंबर या दरम्यान थेरेमा
Next
ऑनलाइऩ लोकमत
नवी दिल्ली, दि. 16- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेमा मे यांचा भारत दौ-याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. 6 ते 8 नोव्हेंबर या दरम्यान थेरेमा या भारत दौऱ्यावर येणार आहेत.
युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पहिलाच युरोपबाहेरील देशाचा दौरा असणार आहे. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचं शिष्टमंडळ यावेळी थेरेमा यांच्यासोबत असणार आहे.यावेळी थेरेमा या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील तसेच दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या हस्ते नवी दिल्लीतील तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन होणार आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यामुळे ब्रिटनमधील अनेक कंपन्यांना नव्याने करार करायला लागणार आहेत. त्यामुळेच मे भारत भेटीवर येणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.