दिल्लीत झाडू चोरांचा सुळसुळाट, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातही झाडू कुलुपबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 16:11 IST2021-07-02T16:10:46+5:302021-07-02T16:11:21+5:30
Delhi News: कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही सुप्रीम कोर्टाच्या आवारात झाडूला कुलुपबंद करण्याची वेळ का आली याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिल्लीत झाडू चोरांचा सुळसुळाट, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातही झाडू कुलुपबंद
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्या झाडू कुलूप लावून रेलिंगशी बांधण्यात आलेल्या दिसून आल्या. हे छायाचित्र अनेक प्रश्न निर्माण करत आहे. एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही सुप्रीम कोर्टाच्या आवारात झाडूला कुलुपबंद करण्याची वेळ का आली याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील आवारात स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सांगितले की लोक त्यांच्या झाडू चोरून घेऊन जातात. त्यामुळे त्यांना नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागले. (Broom thieves are rampant in Delhi, brooms are also locked in the Supreme Court premises )
सर्वोच्च न्यायालयासारख्या कडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्या भागामध्ये जर झाडूची चोरी होऊ लागली तर ती धक्कादायक बाब ठरते. येथी रेलिंगवर एकापाठोपाठ एक झाडू ह्या ताळे लावून लॉक करण्यात आल्या होत्या. याबाबत येथे काम करणाऱ्या जसवंती नामक स्वच्छता कर्मचाऱ्याने सांगितले की, अनेक लोक झाडू चोरून घेऊन जातात त्यामुळे आम्हाला झाडूंना कुलूप लावून सुरक्षित करावे लागते. एका झाडूची किंमत १०० रुपये आहे. तसेच कुलुपाची किंमतही एवढीच आहे. लोकांना फुकटात वस्तू हवी असते, त्यामुळे ते झाडू उचलून घेऊन जातात. त्यांना सारे काही आयते हवे असते.
दरम्यान, रेणू नामक अजून एका महिला सफाई कर्मचाऱ्याने सांगितले की, झाडू चोरणारे चोर कधी पकडले गेलेले नाहीत. जे झाडू चोरी करतात. ते चोरी रात्रीच्या वेळी करतात. जर दिवसा त्यांनी ताळे तोडले तर आम्ही अशा चोराला बघून त्याची पिटाई करू. मात्र हे चोर रात्रीची संधी साधतात कारण त्यावेळी आम्ही येथे नसतो.