कौतुकास्पद! भावाने दगड फोडून शिकवले, समाजातील पहिला सब-इन्स्पेक्टर बनून त्याने कुटुंबाचे नाव उंचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 07:53 PM2021-07-12T19:53:12+5:302021-07-12T20:04:15+5:30

Education News: जीवनात काही करून दाखवायचं असेल तर अशा व्यक्तीला यश मिळवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ही बाब खरी करून दाखवली आहे ती राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील जोगी समाजातील प्रेमनाथ याने.

Brother taught by breaking stones, became the first sub-inspector in the community and raised the family name | कौतुकास्पद! भावाने दगड फोडून शिकवले, समाजातील पहिला सब-इन्स्पेक्टर बनून त्याने कुटुंबाचे नाव उंचावले

कौतुकास्पद! भावाने दगड फोडून शिकवले, समाजातील पहिला सब-इन्स्पेक्टर बनून त्याने कुटुंबाचे नाव उंचावले

googlenewsNext

बाडमेर - कठीण परिस्थितीतून मार्ग काढून यश मिळवायचं असेत तर  परिश्रमांना पर्याय नाही. मात्र जीवनात काही करून दाखवायचं असेल तर अशा व्यक्तीला यश मिळवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ही बाब खरी करून दाखवली आहे ती राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील जोगी समाजातील प्रेमनाथ याने. सापाचे खेळ आणि कालबेलिया नृत्य करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या जोगी समाजातील या तरुणाने मेहनतीच्या जोरावर सब-इन्स्पेक्टर बनण्याचा मान मिळवला आहे. असं यश मिळवणारा प्रेमनाथ हा जोगी समाजातील पहिलाच तरुण ठरला आहे. त्याच्या यशाची वार्ता पसरताच प्रेमनाथच्या घरी अभिनंदन करणाऱ्यांची वर्दळ सुरू झाली आहे. (Brother taught by breaking stones, became the first sub-inspector in the community and raised the family name)

प्रेमनाथच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले होते. त्यामुळे भटकंती करून उदरनिर्वाह करण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्याचे दोन निरक्षर मोठे भाऊ मजुरी करायचे. मात्र प्रेमनाथच्या मनात काही वेगळेच होते. त्यामुळे त्याने शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

सर्वसाधारणपणे जागोजागी फिरून सापाचे खेळ आणि कालबेलिया नृत्य करून दाखवत आपली गुजराण करणाऱ्या जोगी समाजाचा शिक्षणाशी फारसा संबंध आलेला नाही. मात्र प्रेमनाथ याने सर्व अडथळ्यांवर मात करत २०१८ मध्ये पोलीस कॉन्स्टेबलची परीक्षा उत्तीर्ण केली. पटवारी भरती परीक्षा आणि राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षेत अपयश आल्यानंतर प्रेमनाथ याने पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेमनाथ यांनी दिवस-रात्र एक केली आणि कठोर परिश्रम घेतले. आता प्रेमनाथच्या खांद्यावर पोलिसांचे स्टार लागणार आहेत. कुठलेही यश हे संघर्षाशिवाय मिळत नाही. मी माझ्या समाजातील पहिला पोलीस सब-इन्स्पेक्टर बनल्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया प्रेमनाथ याने दिली.

प्रेमनाथ हा आठ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हा मोठा भाऊ गणेशनाथ याने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. मात्र बइया गावात रोजगार न मिळाल्याने भियाड गावात स्थलांतर केले. येथे गणेशनाथ याने डोंगरामध्ये दगड फोडून कुटुंबाच्या पालनपोषणाबरोबरच प्रेमनाथचे शिक्षण सुरू ठेवले. अखेर २०१८ मध्ये प्रेमनाथ याची पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाली होती. आता प्रेमनाथ याला आता बाडमेर ग्रामीण पोलीस ठाणे क्षेत्रात नियुक्ती मिळाली आहे.  

Web Title: Brother taught by breaking stones, became the first sub-inspector in the community and raised the family name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.