मुंजवाड गणात इच्छुकांची भाऊगर्दी
By admin | Published: October 25, 2016 10:39 PM2016-10-25T22:39:36+5:302016-10-25T22:56:48+5:30
सटाणा : बागलाण पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. तालुक्यात अनुसूचित जातीसाठी ब्रााणगाव गणाऐवजी यावेळी मुंजवाड हा एकमेव गण आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील इच्छुकांनी आता मुंजवाड गणाकडे मोर्चा वळविल्याने इच्छुकांची गर्दी वाढली असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील जायखेडा, नामपूर, ब्रााणगाव व ठेंगोडा गटात अनुसूचित जाती प्रवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असताना एकमेव मुंजवाड गण राखीव करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच इच्छुकांची गर्दी झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरु वात केली आहे. या गणामधून नवी शेमळी येथील राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक खरे यांनी मोर्चेबांधणीला सुरु वात केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस पक्षाकडून दावेदारी केली असून, त्यांनी गटामधून महासंपर्कफेरीचे आयोजन करून शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे विद्यमान सदस्य मायावती धिवरे, केतन सोनवणे, देवीदास बच्छाव यांनीदेखील मुंजवाड गणामधून चाचपणी सुरू केली आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य संजय गरु ड व श्रीमती धिवरे यांनी कॉँग्रेस पक्षाकडून दावेदारी केली आहे. मुंजवाड येथील माध्यमिक शिक्षक संजय बच्छाव यांनीदेखील मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्यांनी युतीकडून दावेदारी केली आहे. मुळाणे येथील संजय अहिरे, ब्रााणगाव येथील बापू खरे यांनीही युतीकडून दावेदारी केली आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे गटातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.