२१ वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलीशीच करणार विवाह; बहिणींनी भावांकडून घेतले वचन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 06:08 AM2021-08-24T06:08:48+5:302021-08-24T06:09:04+5:30
२१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलींचा विवाह करायचा नाही, असे धोरण जिंद येथील लाडो पंचायतीने स्वीकारले आहे.
- बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदीगड : २१ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीशी विवाह करणार नाही, असे वचन हरियाणातील बहिणींनी रक्षाबंधन दिनानिमित्त आपल्या भावाकडून घेतले आहे. तसेच कोणत्याही बहिणीचा विवाह तिच्या वयाला २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही, असा निर्धार भावांनीही केला आहे.
२१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलींचा विवाह करायचा नाही, असे धोरण जिंद येथील लाडो पंचायतीने स्वीकारले आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलीचा विवाह कायदेसंमत आहे. या वयातही लग्न होणे हे मुलींसाठी हितावह गोष्ट नाही, असे सेल्फी विथ डॉटर या मोहिमेचे संचालक सुनील जागलान म्हणाले.
जनजागृती करणार
सेल्फी विथ डॉटर या मोहिमेचे संचालक सुनील जागलान म्हणाले की, कमी वयात होणाऱ्या लग्नामुळे अनेक मुलींचे भविष्य करपून जाते. या प्रथेला विरोध करण्यासाठी आम्ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.