ब्रू निर्वासितांचे रेशन, मदत १५ जानेवारीपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 05:38 AM2019-01-10T05:38:46+5:302019-01-10T05:39:28+5:30

त्रिपुरात सहा छावण्या; ३२ हजार जण जगतात हलाखीत

Brune immigrant ration, help stopped January 15th | ब्रू निर्वासितांचे रेशन, मदत १५ जानेवारीपासून बंद

ब्रू निर्वासितांचे रेशन, मदत १५ जानेवारीपासून बंद

Next

आगरतळा : उत्तर त्रिपुरातील कांचनपूर, पाणीसागर येथे सहा निर्वासित छावण्यांमध्ये अद्यापही राहत असलेल्या ३२ हजार निर्वासितांना सरकारकडून रेशनवर देण्यात येणारे अन्नधान्य व आर्थिक मदत येत्या १५ जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. ब्रू जमातीच्या लोकांची मिझोराममध्ये गेल्या २५ आॅगस्टपासून आठ टप्प्यांमध्ये पाठवणी करण्यासंदर्भात त्यांच्या नेत्यांशी केंद्र सरकारने करार केला होता. त्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंत फक्त १४२ लोकांचीच पाठवणी करण्यात आली. सरकारने देऊ केलेली मदत अपुरी असल्याचे सांगून निर्वासितांनी ती नाकारली होती.

सर्व ब्रू निर्वासितांना पुन्हा मिझोराममध्ये पाठविण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने या निर्वासित छावण्यांना देण्यात येणारी मदत गेल्या १ आॅक्टोबरपासून केंद्रीय गृहखात्याने बंद केली होती; मात्र या निर्वासितांची उपासमार होऊ लागल्याने तीन आठवड्यांनंतर त्यांच्यासाठी अन्नधान्य व अन्य गोष्टींचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. या निर्वासित छावण्यांची मदत जानेवारीत बंद करण्यात येईल, असे गृहखात्याचे सहसचिव सत्येंद्र गर्ग यांनी त्रिपुरा सरकारला गेल्या वर्षी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. (वृत्तसंस्था)

वांशिक दंगलींमुळे त्रस्त

च्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी एक ते दोन दिवसांत हस्तक्षेप करावा व ब्रू निर्वासितांची मदत यापुढेही सुरू ठेवावी, अशी विनंती त्यांना मिझोराम ब्रू डिस्प्लेस्ड पीपल्स फोरम (एमबीडीपीएफ) करणार आहे. ही माहिती या संघटनेचे सचिव ब्रूनो मशा यांनी दिली.
च्सन १९९७-९८ साली उसळलेल्या वांशिक दंगलींनंतर मिझोराममधील ब्रू जमातीचे ३७ हजार लोक मामित, कोलासिब, लुंगलेई येथून विस्थापित होऊन त्रिपुरामध्ये आले. तेथील कांचनपूर व पाणीसागर येथे सहा निर्वासित छावण्यांमध्ये राहू लागले होते.
 

Web Title: Brune immigrant ration, help stopped January 15th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.