फेसबुकवर टाकले पीडित महिलेचे विवस्त्र छायाचित्र
By admin | Published: July 21, 2014 02:20 AM2014-07-21T02:20:14+5:302014-07-21T02:20:14+5:30
लखनौ सामूहिक बलात्कारातील पीडित महिलेचे विवस्त्र छायाचित्र फेसबुकवर टाकल्याप्रकरणी मोहनलाल गंज पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले.
लखनौ : लखनौ सामूहिक बलात्कारातील पीडित महिलेचे विवस्त्र छायाचित्र फेसबुकवर टाकल्याप्रकरणी मोहनलाल गंज पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, बलात्कारप्रकरणी पोलिसांनी पीजीआयचा सुरक्षा गार्ड राम सेवक (३८) यास अटक केली आहे. त्याच्यावर दोन मुलाच्या आईचा खून आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
लखनौमध्ये काही पुरुषांनी एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून नंतर तिचा खून केला होता. अटकेतील सुरक्षारक्षक एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तैनात होता. त्याने गुन्हा कबूल केल्याचे सूत्रांनी सांगितले. हे प्रकरण सामूहिक बलात्काराचे असल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला. पोलिसांनी सुरक्षारक्षकाशिवाय आणखी तिघांना घटनास्थळाजवळील एका गावातून अटक केली. अत्याचार करणारे पीडितेला आधीपासून ओळखत असल्याचे समजते. अधिक तपास सुरू आहे. (वृत्तसंस्था)