बांगलादेशमधून अवैध पद्धतीनं भारतात प्रवेश करणाऱ्या चीनी नागरिकाला BSF नं केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 02:52 PM2021-06-10T14:52:36+5:302021-06-10T14:54:38+5:30

भारत-बांगलादेश सीमेवर (India Bangladesh Border) बांगलादेशमधून अवैध पद्धतीनं भारतात प्रवेश करणाऱ्या एका चीनी नागरिकाला (Chinese Citizen) भारतीय सुरक्षा दलानं (BSF) अटक केली आहे.

bsf arrested a chinese national who entered india illegally from bangladesh | बांगलादेशमधून अवैध पद्धतीनं भारतात प्रवेश करणाऱ्या चीनी नागरिकाला BSF नं केली अटक

बांगलादेशमधून अवैध पद्धतीनं भारतात प्रवेश करणाऱ्या चीनी नागरिकाला BSF नं केली अटक

Next

भारत-बांगलादेश सीमेवर (India Bangladesh Border) बांगलादेशमधून अवैध पद्धतीनं भारतात प्रवेश करणाऱ्या एका चीनी नागरिकाला (Chinese Citizen) भारतीय सुरक्षा दलानं (BSF) अटक केली आहे. सदर व्यक्ती मालदा जिल्ह्यातील मानिकचकला लागून असलेल्या सीमेतून प्रवेश करत होता त्याचवेळी बीएसएफच्या जवानांनी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती चीनी नागरिक असून त्याचं नाव होन जूं असं आहे. सध्या त्याला मानिकचक पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं असून चौकशी सुरू आहे. 

बीएसएफकडून मिळालेल्या माहितीनुसार सीमेवर मालदाच्या सुल्तानपुर येथे बीएसएफनं एका चीनी नागरिकांला अटक केली आहे. त्याच्याकडे लॅपटॉप देखील मिळाला आहे. तो आज सकाळी अवैध पद्धतीनं बांगलादेशमध्ये आला होता. बांगलादेशचा व्हिसा असलेल्या या नागरिकांकडून चीनी पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला आहे. बीएसएफची १५९ नंबर बटालियन पेट्रोलिंग करत असताना सदर व्यक्ती संशयास्पद वाटल्यानं त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर अटक करण्यात आली. विविध सुरक्षा यंत्रणांकडून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची चौकशी सध्या सुरू आहे.

Web Title: bsf arrested a chinese national who entered india illegally from bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.