पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीच उल्लंघन, गोळीबारात भारताचा एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 06:33 AM2018-01-18T06:33:50+5:302018-01-18T12:14:08+5:30
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लघंन करण्यात आले आहे. आरएसपूरा आणि अरनिया परिसरातील नियंत्रण रेषेचे उल्लंघन करीत पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा गोळीबार केला.
जम्मू कश्मीर - पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीच उल्लंघन करण्यात आले आहे. आरएसपूरा आणि अरनिया परिसरातील नियंत्रण रेषेचे उल्लंघन करीत पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा गोळीबार केला. या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे.
सैन्य दिनी भारतीय लष्कराकडून जबरदस्त दणका मिळाल्यानंतरही पाकिस्तानी सैन्याने बुधवारी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लघंन केलं. आरएसपूरा आणि अरनिया येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांना टार्गेट करत गोळीबार केला. माध्यमांच्या वृत्तानुसार, भारतीय लष्करानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरु होता.
A BSF Jawan has lost his life in ceasefire violation by Pakistan in R S Pura sector #JammuAndKashmir
— ANI (@ANI) January 18, 2018
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सैन्य दिनी पूंछ सेक्टरमध्ये भारताने केलेल्या गोळीबारात 7 पाकिस्तानी सैनिक ठार तर चार सैनिक जखमी झाले होते. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं. याच्याविरोधात भारताने ही कारवाई केली होती. पण पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीच उल्लंघन केलं जात आहे. सोमवारी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानमधील पूंछ सेक्टर येथील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर भारतीय सैन्याने गोळीबार केला. यात पाकचे सात जवान ठार झाले. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ‘जैश- ए- मोहम्मद’च्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घटना ताजी असतानाच भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे.
मंगळवारी संध्याकाळी पूँछमधील चाकन दा बाग भागात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय लष्कराचे कॅप्टन जखमी झाले होते.