पाकिस्तानच्या गोळीबारात BSF जवान शहीद
By Admin | Published: October 24, 2016 07:19 AM2016-10-24T07:19:55+5:302016-10-24T09:02:09+5:30
गंभीररीत्या जखमी झालेले बीएसएफचे जवान हेड कांस्टेबल सुशील कुमार यांचा जखमी अवस्थेत उपचार घेत असताना जम्मूतील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
ऑनाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत असताना गंभीररीत्या जखमी झालेले बीएसएफचे जवान हेड कॉन्स्टेबल सुशील कुमार शहीद झाले. उपचारांदरम्यान सरकारी वैद्यकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
शहीद सुशील कुमार हरियानाच्या कुरूक्षेत्रमध्ये राहणारे आहेत. शुक्रवारी रात्री जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील आरएस पूरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत त्यांच्या छातीवर गोळी लागली होती. त्याचप्रमाणे शरीराच्या इतर भागातही त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. काल रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दरम्यान, शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी चांगलीच अद्दल घडवली होती. त्यांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात पाकिस्तानी रेंजर्स आणि सीमा पार करून भारतात घुसू पाहणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.
#FLASH One more BSF jawan was injured in the ceasefire violation in RS Pura (J&K)
— ANI (@ANI_news) October 24, 2016