आता देशासाठी नाही कुटुंबीयांसाठी उचलणार शस्त्र, बीएसएफ जवानाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 13:57 IST2018-02-06T13:42:49+5:302018-02-06T13:57:35+5:30
'मला इतकं हतबल करू नका, मी देशाच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेतलं आहे, पण आता स्वतःच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी शस्त्र उचलण्याची वेळ माझ्यावर आली आहे. मी सीमेवर देशाच्या सुरक्षेत असताना...

आता देशासाठी नाही कुटुंबीयांसाठी उचलणार शस्त्र, बीएसएफ जवानाची धमकी
सहारनपूर : बीएसएफच्या एका जवानावर नाईलाजाने पान सिंह तोमर यांच्या मार्गावर जाण्याची वेळ आली आहे. अजय सिंह असं या जवानाचं नाव असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर अजय सिंह यांनी एक व्हिडीओ अपलोड करून जर न्याय मिळाला नाही तर देशाच्या सुरक्षेऐवजी स्वतःच्या घराच्या, कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी शस्त्र उचलण्याची धमकी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या तातारपूर येथील बीएसएफ जवान अजय सिंह हे भारत-बांग्लादेश सीमेवर तैनात असतात.
पोलिसांचा जाच -
'मला इतकं हतबल करू नका, मी देशाच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेतलं आहे, पण आता स्वतःच्या घराच्यांच्या सुरक्षेसाठी शस्त्र उचलण्याची वेळ माझ्यावर आली आहे. त्यासाठी जबाबदार पोलीस प्रशासन असेल. मी सीमेवर देशाच्या सुरक्षेत असताना माझं कुटुंब मात्र तिकडे धोक्यात जगतंय, असं ते व्हिडीओत म्हणत आहेत.
काय आहे प्रकरण -
अजय सिंह म्हणाले, त्यांच्या गावाकडच्या जमिनीवर पोलिसांनी जबरदस्ती कब्जा मिळवला. वृद्ध वडिलांना मारहाण करण्यात आली तसंच त्यांना तुरूंगातही टाकलं, कॉलेजमध्ये शिकणा-या बहिणींना नाहक त्रास दिला. गंगोह पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली तोडफोड केली, अखेर आरोपींवर कारवाई का होत नाही, माझी सुनावणी का होत नाहीये असं म्हणत व्हिडीओच्या अखेरीस अजय सिंह यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवरही आरोप लावला आहे. भाजपा सरकार जवनांच्या मागण्या ऐकत नाही असा आरोप त्यांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ -