बीएसएफचे विमान कोसळले

By Admin | Published: December 23, 2015 02:27 AM2015-12-23T02:27:25+5:302015-12-23T03:28:21+5:30

दिल्लीहून रांचीला जात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) एक चार्टर्ड विमान मंगळवारी सकाळी द्वारकेजवळ आपत्कालीन परिस्थितीत उतरत असताना कोसळले.

BSF plane collapses | बीएसएफचे विमान कोसळले

बीएसएफचे विमान कोसळले

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीहून रांचीला जात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) एक चार्टर्ड विमान मंगळवारी सकाळी द्वारकेजवळ आपत्कालीन परिस्थितीत उतरत असताना कोसळले. या भीषण अपघातात वैमानिक, सहवैमानिक आणि तीन अधिकाऱ्यांसह सर्व १० जण प्रवासी मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये बीएसएफच्या अभियांत्रिकी चमूतील सदस्यांचा समावेश आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, कोसळताच विमान पूर्णत: उद्ध्वस्त झाले. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये वैमानिक भगवती प्रसाद, सहवैमानिक राजेश शिवरेन, डेप्युटी कमांडंट डी. कुमार, बीएसएफच्या अभियांत्रिकी चमूचे सदस्य राघवेंद्र, छोटेलाल, एस.एम. शर्मा, रवींद्रकुमार, डी.पी. चौहान, सुरेंद्र सिंग आणि के. रावत यांचा समावेश आहे. बीएसएफचे प्रवक्ता कमांडेंट पाराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारकाजवळ शाहाबाद-मोहम्मदपूर रेल्वेस्थानकापासून सुमारे ५० मीटर अंतरावर सकाळी १० वाजता हा अपघात झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
विमानातील निमलष्करी दलाच्या दहा जवानांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सफदरजंग इस्पितळात पाठविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. हे मृतदेह जलाशयातून बाहेर काढले तेव्हा जळालेल्या अवस्थेत होते अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळाल्यावरच अपघाताचे नेमके कारण कळेल,असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: BSF plane collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.