बांग्लादेश बॉर्डरवर तैनात BSF ची फीमेल डॉग झाली प्रेग्नेंट, कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 04:05 PM2022-12-31T16:05:50+5:302022-12-31T16:06:38+5:30

BSF Female Dog gets Pregnant : 43व्या बटालियनच्यी फीमेल डॉग लॅल्सीने गेल्या 5 सप्टेंबरला सीमा चौकी बाघमारामध्ये तीन पिल्लांना जन्म दिला. शिलॉन्ग येखील बीएसएफच्या क्षेत्रीय मुख्यालयाने याबाबत संक्षिप्त कोर्टाची चौकशी करण्याचा आदेश जारी केला आहे.

BSF sniffer dog deployed on Bangladesh border gets pregnant court of inquiry ordered in Meghalaya | बांग्लादेश बॉर्डरवर तैनात BSF ची फीमेल डॉग झाली प्रेग्नेंट, कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश

बांग्लादेश बॉर्डरवर तैनात BSF ची फीमेल डॉग झाली प्रेग्नेंट, कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश

googlenewsNext

BSF Female Dog gets Pregnant :  मेघालयाला लागून बांग्लादेश बॉर्डरवर सीमा सुरक्षा दलाची (BSF) एक फीमेल डॉग प्रेग्नंट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लॅल्सी नावाच्या डॉगने तीन पिल्लांना जन्म दिला. शेवटी फीमेल डॉग प्रेग्नेंट कशी झाला? याचा पत्ता लावण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश दिला गेला आहे. चौकशीचा आदेश बीएसएफच्या नियमांनुसार देण्यात आला आहे.

43व्या बटालियनच्यी फीमेल डॉग लॅल्सीने गेल्या 5 सप्टेंबरला सीमा चौकी बाघमारामध्ये तीन पिल्लांना जन्म दिला. शिलॉन्ग येखील बीएसएफच्या क्षेत्रीय मुख्यालयाने याबाबत संक्षिप्त कोर्टाची चौकशी करण्याचा आदेश जारी केला आहे. याची जबाबदारी बीएसएफचे डेप्युटी कमांडेंट अजीत सिंह यांना देण्यात आली आहे. त्यांना या महिन्याच्या शेवटपर्यंत आपली रिपोर्ट सादर करायचा आहे. 

दरम्यान बीएसएफसहीत इतर केंद्रीय दलातील डॉग्सचं प्रशिक्षण, प्रजनन, लसीकरण, आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. तेच नियमांनुसार, बीएसएफमधील पशु चिकिस्ता विंगचा सल्ला आणि देखरेखीतच डॉग्सना प्रजनन करण्याची परवानगी असते. 

डॉग्स ट्रेनर्सना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केलं जातं आणि फार कमी अंतराने त्यांच्या आरोग्यासंबंधी टेस्ट केल्या जातात. सोबतच बीएसएफ कॅम्प, बीओपी, किंवा एखाद्या दुसऱ्या ड्युटीवर तैनात डॉग्सना नजरेपासून दूर केलं जात नाही. जर ते कॅम्पच्या बीओपीमध्ये असतील तर तिथे सुरक्षा असते. कोणतेही बाहेरील डॉग किंवा मोकाट डॉग तिथे येऊ शकत नाहीत.

एक्सपर्ट्सनुसार, जास्तीत जास्त प्रजातीच्या फीमेल डॉग वर्षातून दोन वेळा गर्भवती होऊ शकतात. त्यासाठी ते 18 महिन्यांचे असावे लागतात. तेच केंद्रीय सुरक्षा दलात वर्षातून एकदाच फीमेल्स डॉग्सना गर्भावस्थेसाठी तयार केलं जातं.

Web Title: BSF sniffer dog deployed on Bangladesh border gets pregnant court of inquiry ordered in Meghalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.