नापाक गोळीबाराला बीएसएफचे चोख प्रत्युत्तर, १५ पाकिस्तानी सैनिक ठार

By admin | Published: October 28, 2016 09:16 AM2016-10-28T09:16:19+5:302016-10-28T16:57:14+5:30

बीएसएफकडून पाकिस्ताला दिलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून रेंजर्सचे 2 ते 3 तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत

BSF's heartfelt response to a firing, 15 Pakistani soldiers killed | नापाक गोळीबाराला बीएसएफचे चोख प्रत्युत्तर, १५ पाकिस्तानी सैनिक ठार

नापाक गोळीबाराला बीएसएफचे चोख प्रत्युत्तर, १५ पाकिस्तानी सैनिक ठार

Next
ऑनलाइन लोकमत

जम्मू काश्मीर, दि. 28 - आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करुन बीएसएफ चौक्यांवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानच्या या नापाक गोळीबाराला बीएसएफनेही सडतोड प्रत्युत्तर दिले. बीएसएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत १५ पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्याची माहिती बीएसएफने दिली आहे. 

पाकिस्तानने नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवाला सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात तोफाचा भडीमार करुन गोळीबार केला. गेल्या 12 तासांमध्ये पाकिस्तानकडून सहा वेळा शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आलं आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं असून बीएसएफकडून पाकिस्तानच्या शक्करगढ भागात करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच खूप नुकसान झालं आहे.

पाकिस्तानचे 15 जवान ठार झाले असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार यांनी दिली आहे. तसंच पाकिस्तानी रेंजर्सचे 2 ते 3 तळ उद्ध्वस्त केल्याचीही माहिती मिळाली आहे.

(भारतीय चौक्यांवर पाकिस्तानचा भ्याड हल्ला)
 

सर्जिकल स्ट्राइक्सनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सीमेपलिकडून सातत्याने गोळीबार सुरू ठेवला असून, गुरुवारीही अंधार पडताच भ्याड पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर जोरदार बॉम्बवर्षाव व गोळीबार केला. हल्ल्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात अनेक पाक रेंजर्स जखमी झाले असून पाकच्या अनेक गावांमध्ये आग लागल्याचे वृत्त आहे. गोळीबारात पाच भारतीय जवान जखमी झाले आहेत. त्यांना हवाईमार्गे इस्पितळात हलविण्यात आले.
 
(पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन सुरुच, एक जवान शहीद)
(अंधार पडताच पाकचा भारतीय चौक्यांवर हल्ला)
 
तंगधार, अखनूर आणि मेंढर या ठिकाणांवर पाक रेंजर्सनी जोरदार गोळीबार केला. गोळीबारामुळे सीमेवरील गावक-यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना फोन करून पाकला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनाही नियंत्रण रेषेवरील हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 

पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ दबा धरून बसले. त्यांच्याकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता. तसेच ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारनेही हल्ला केला जात होता. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाल्याचे वा ठार झाल्याची शंका आहे. त्यांच्यासाठी सीमेपलिकडे मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका असल्याचे दिसून आले आहे. भारताचा सर्जिकल स्ट्राईक्सनंतर पाकने ५५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
 

गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये एका सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून 30 ग्रामस्थ जखमी झाले आहेत.
 

Web Title: BSF's heartfelt response to a firing, 15 Pakistani soldiers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.