मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय; BSNL च्या पुनरुज्जीवनासाठी 89000 कोटींच्या पॅकेजला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 04:15 PM2023-06-07T16:15:44+5:302023-06-07T16:22:13+5:30
पॅकेजचा वापर BSNL च्या 4G आणि 5G सेवा वाढवण्यासाठी केला जाईल.
Modi Cabinet Decisions: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (7 जून) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL साठी 89,000 कोटी रुपयांची पुनरुज्जीवन योजना मंजूर करण्यात आली आहे. पॅकेजचा वापर BSNL च्या 4G आणि 5G सेवा वाढवण्यासाठी केला जाईल.
यापूर्वीही मिळाले पॅकेज
केंद्राने जाहीर केलेले बीएसएनएलचे हे पहिले पुनरुज्जीवन पॅकेज नाही. केंद्राने जुलै 2022 मध्ये BSNL ला 4G आणि 5G सेवा प्रदान करण्यासाठी पुनरुज्जीवन पॅकेज दिले होते. हे पॅकेज अॅडव्हान्स सेवा आणि क्वालिटी, बीएसएनएलची बॅलेंसशीट ठीक करणे आणि बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या विस्तारासाठी होते. सरकारने भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) चे BSNL मध्ये विलीनीकरण केले.
जिओमुळे परिस्थिती बिघडली
सरकार सध्या बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनाचा विचार करत आहे, पण एकेकाळी ही कंपनी विकण्याचीही तयारी केली होती. खरेदीदार न मिळाल्याने कंपनीच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला. याचे कारण म्हणजे बीएसएनएलवर बरेच कर्ज होते. दुसरीकडे जिओची मार्केटमध्ये एंट्री झाल्यामुळे या क्षेर्तातील दिग्गजांचाहे धाबे दणाणले. एमटीएनएलही मोठ्या तोट्यात होती, त्यामुळे सरकारने एमटीएनएलचे बीएसएनएलमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे.
एमटीएनएलच्या शेअर्समध्ये घसरण
बीएसएनएलच्या पुनरुज्जीवन पॅकेजच्या वृत्तानंतर एमटीएनएलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. सध्या कंपनीचा शेअर 13 टक्क्यांच्या वाढीसह 22.43 रुपयांवर व्यवहार करत आहे. तसे, ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 22.58 रुपयांवर पोहोचला. आज कंपनीचा शेअर 19.90 रुपयांवर सुरू झआला. मंगळवारी कंपनीचा शेअर 19.94 रुपयांवर बंद झाला होता. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 1,426.32 कोटी रुपये आहे.