दरयुद्धात बीएसएनएलची उडी!

By Admin | Published: April 24, 2017 01:11 AM2017-04-24T01:11:07+5:302017-04-24T01:11:07+5:30

दूरसंचार कंपन्यात दरयुद्ध छेडले गेले असून, आता सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने तीन नव्या योजना जाहीर केल्या आहेत

BSNL jump in the war! | दरयुद्धात बीएसएनएलची उडी!

दरयुद्धात बीएसएनएलची उडी!

googlenewsNext

नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्यात दरयुद्ध छेडले गेले असून, आता सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने तीन नव्या योजना जाहीर केल्या आहेत. ३३३ रुपयांत २७० जीबी डाटा देण्याच्या योजनेचा समावेश आहे. यानुसार, दररोज ३ जीबी डाटा मिळणार आहे.
रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात मोफत सेवा देण्याचा
धमाका केल्यानंतर, आयडिया, एअरटेल तथा व्होडाफोन यांच्यात दरयुद्ध छेडले गेले आहे. त्यात आता बीएसएनएल या सरकारी कंपनीनेही उडी घेतली आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी...-
दूरसंचार क्षेत्रात जिओने दरयुद्ध छेडल्यानंतर यात आता बीएसएनएल या सरकारी कंपनीने उडी घेतली आहे. बाजारपेठेत टिकून राहाण्यासाठी या कंपन्यांना आता अशा योजना जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करण्यापलीकडे पर्यायच नसल्याचे मत यातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
व्होडाफोन, एअरटेल यासारख्या कंपन्यांनीही यापूर्वीच नव्या योजना जाहीर केल्या आहेत. देशभरात विशेषत: ग्रामीण भागातही बीएसएनएलचे मोठे जाळे आहे. अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा सध्या या कंपन्यांमध्ये लागली आहे.
‘ट्रिपल एस’-
333रुपयांत रोज इंटरनेट वापराची मर्यादा ३ जीबीपर्यंत असून, ९० दिवसांपर्यंत अमर्याद कॉल.
‘दिल खोल के बोल’-
349रुपयांत ग्राहकाला अमर्याद लोकल आणि एसटीडी कॉल करता येणार आहेत. २ जीबी ३ जी डाटा दररोज मिळणार आहे.
‘नहले पे दहला’-
395रुपयात ३००० मिनिटे फ्री, तर अन्य फोनवर १८०० मिनिटे मिळणार आहेत. याची मुदत ७१ दिवसांची आहे. दररोज २ जीबी (३जी) डाटा मिळणार आहे.

Web Title: BSNL jump in the war!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.