बीएसएनलची सेवा विस्कळीत ग्राहक वैतागले; दीड महिन्यापासून होतोय त्रास

By Admin | Published: July 8, 2016 06:17 PM2016-07-08T18:17:24+5:302016-07-08T18:17:24+5:30

नशिराबाद- गेल्या दीड महिन्यापासून बीएसएनएलच्या सतत विस्कळीत होणार्‍या नेटवर्कअभावी मोबाईल ग्राहक वैतागले आहे तर दूरध्वनी सेवा रोजच काही तास ठप्प होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून बीएसएनएलच्या ढिम्मपणाबाबत ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहे. ग्राहकांची पिळवणूक थांबवा अशी अपेक्षा आहे.

BSNL service disrupts customer disruption; Troubles caused by one and a half months | बीएसएनलची सेवा विस्कळीत ग्राहक वैतागले; दीड महिन्यापासून होतोय त्रास

बीएसएनलची सेवा विस्कळीत ग्राहक वैतागले; दीड महिन्यापासून होतोय त्रास

googlenewsNext
िराबाद- गेल्या दीड महिन्यापासून बीएसएनएलच्या सतत विस्कळीत होणार्‍या नेटवर्कअभावी मोबाईल ग्राहक वैतागले आहे तर दूरध्वनी सेवा रोजच काही तास ठप्प होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून बीएसएनएलच्या ढिम्मपणाबाबत ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहे. ग्राहकांची पिळवणूक थांबवा अशी अपेक्षा आहे.
लोकसंख्या सुमारे पन्नास हजार आहे त्यामानाने बीएसएनएलचे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या दीड महिन्यापासून नेटवर्कच सुरळीत मिळत नसल्याने ग्राहक हतबल झाले आहे. संबंधित व्यक्ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, काही वेळेला तर हा क्रमांक अस्तीत्वात नाही, असा आवाज येतो. नो रजिस्ट्रेशन, फक्त इमरजन्सी कॉल असा प्रकारच्या अनुभवामुळे ग्राहक बेजार झाला असून संपर्कच होत नसल्याने संतापाची लाट पसरली आहे, गेल्या दीड महिन्यापासून तक्रार होत असूनही संबंधित कंपनीने याबाबत खुलासाही केला नाही, नेमकी अडचण काय आहे? कधी सुरळीत होणार सेवा? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. बीएसएनएलचे नेटवर्कच मिळत नसल्याने अखेर ग्राहकांनी अन्य कंपनीच्या सेवेचा आधार घेण्यासाठी धावपळ करीत आहे.
गॅस बुकिंगसाठी जो क्रमांक दाखल केला आहे तोच क्रमांक नेटवर्कमुळे ठप्प झाल्याने गॅस बुकिंग करण्यासाठी डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे गृहिणी हतबल झाले आहे.
त्यातच दूरध्वनी सेवाही सकाळी , सायंकाळी तासन्तास विस्कळीत होत आहे. त्यामुळे ग्राहकांत नाराजी आहे. संबंधित विभागाने याबाबत तत्काळ दखल घेऊन नेटवर्क सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: BSNL service disrupts customer disruption; Troubles caused by one and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.