BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 10:27 AM2020-08-17T10:27:02+5:302020-08-17T10:28:35+5:30

घरातून काम करत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर डेटा लागत आहे. यामुळे बीएसएनएलने 3 जीबी डेटा दररोजचाही प्लॅन आणला आहे.

BSNL's affordable plan; 3GB data per day, free calling for just Rs 78 | BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग

BSNL चा जबरदस्त प्लॅन; केवळ 78 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, मोफत कॉलिंग

Next

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला (BSNL) खासगी कंपन्यांकडून मोठी स्पर्धा मिळत आहे. यामुळे BSNL या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एकसो एक ढांसू प्लॅन बाजारात आणत आहे. घरातून काम करत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर डेटा लागत आहे. यामुळे बीएसएनएलने 3 जीबी डेटा दररोजचाही प्लॅन आणला आहे. महत्वाचे म्हणजे हा प्लॅन केवळ 78 रुपयांपासून सुरु होत आहे. 


BSNL च्या या प्लॅनमध्ये दरदिवशी 3 जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय ग्राहकांना कॉलिंगसाठी दिवसाला 250 मिनिट देण्यात येत आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी 8 दिवसांची आहे. याचसोबत इरॉस नाऊचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. हा प्लॅन बीएसएनएलच्या काही निवडक सर्कलमध्ये उपलब्ध आहे. 


247 रुपयांचा एसटीव्ही
36 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह असलेला प्लॅन रोज 3 जीबी डेटा आणि मोफत कॉलिंगचा फायदा देतो. 250 मिनिटे दिवसाला मोफत कॉलिंग देण्यात येते. तसेच डेली डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेटचा स्पीड 80 Kbps वर येतो. हा प्लॅन बीएसएनएलच्या जवळपास सर्व सर्कलमध्ये उपलब्ध आहे. 

यानंतर आणखी एक चांगला प्लॅन आहे.  997 रुपयांच्या रिचार्जद्वारे रोज तीन जीबी डेटा मिळतो. हे फर्स्ट रिचार्ज कूपन असल्याने पहिल्यांदाच रिचार्ज करणाऱ्यांना याचा फायदा होतो. यामध्येही वरील प्रमाणेच कॉलिंग मिळते. शिवाय दोन महिन्यांसाठी कॉलर ट्यूनही मिळते. 


1999 रुपये 365 दिवस
दिवसाला 3 जीबी डेटा आणि 365 दिवसांची व्हॅलिडिटी असे या प्लॅनचे स्वरूप आहे. दिवसाला 100 SMS आणि 250 एफयुपी मिनिट कॉलिंग फ्री मिळणार आहे. डेली डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेटचा स्पीड 80 Kbps वर येतो. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी

सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार

हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा

शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार

TATA कंपनीला ब्रिटिशांचा 'टाटा'; मिळणार नाही बेलआऊट पॅकेज

मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही

चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज

व्होडाफोन, एअरटेल ग्राहकांना झटका देणार; सप्टेंबरपासून रिचार्ज महाग होण्याची शक्यता 

Web Title: BSNL's affordable plan; 3GB data per day, free calling for just Rs 78

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.