जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलची अनोखी ऑफर
By Admin | Published: January 1, 2017 09:24 PM2017-01-01T21:24:00+5:302017-01-01T21:24:00+5:30
रिलायन्स जिओसारखं मोबाईलवरून विनाशुल्क मोफत बोलण्याचा प्लॅन बीएसएनएलने आणला आहे.
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १ - रिलायन्स जिओनंतर मोबाईलवरून विनाशुल्क मोफत बोलण्याचा प्लॅन बीएसएनएलने आणला आहे. मात्र यासाठी तुम्हाला १४४ रुपये मोजावे लागणार आहेत. यात महिन्याच्या कालावधीसाठी कोणत्याही नेटवर्कसाठी लोकल आणि एसटीडी कॉल मोफत करता येतील. विविध दूरसंचार कंपन्यांकडून अमर्यादित कॉलच्या योजना जाहीर करण्यात येत असताना आता बीएसएनएलनेही नवी योजना आणली आहे.
बीएसएनएलचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ही योजना सहा महिन्यांसाठी वैध आहे. या अंतर्गत एका महिन्यासाठी कोणत्याही नेटवर्कवरून अमर्यादित कॉल करता येतील. त्याचसोबत ३०० एमबी डेटा असेल.
२०१४-१५ मध्ये बीएसएनएलला ६९१ कोटी रुपयांचा तोटा झाला. आगामी काळात बीएसएनएलला नफा मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. बीएसएनएलचे देशात ६४,५०० मोेबाईल टॉवर आहेत, तर ५० हजारांहून अधिक आॅप्टिकल फायबर केबल कनेक्टिव्हिटी आहेत. १४९ व २४९ रुपयांचे दोन प्लॅन बीएसएनएलने आणले आहेत. बीएसएनएलच्या ग्राहक संख्येत महिन्याला दीड लाखांनी वाढ होत आहे. कंपनीने ४४०० वायफाय हॉटस्पॉटसह अनेक नव्या योजना आणल्या आहेत. आगामी एक वर्षात आमच्याकडे ४० हजार नवे हॉटस्पॉट असतील, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.