BSNL चा ग्राहकांना अनलिमिटेड झटका; या लोकप्रिय प्लॅनमध्ये मोठा बदल

By हेमंत बावकर | Published: November 3, 2020 05:23 PM2020-11-03T17:23:13+5:302020-11-03T17:23:39+5:30

BSNL STV Plans : ग्राहकांनी जुना प्लॅन रिचार्ज केला असेल तर तो चालूच राहणार आहे. BSNL STV 395 नवीन बदल करण्यात आले आहेत.

BSNL's Unlimited Shock to Customers; Calling Limited made in STV 395 | BSNL चा ग्राहकांना अनलिमिटेड झटका; या लोकप्रिय प्लॅनमध्ये मोठा बदल

BSNL चा ग्राहकांना अनलिमिटेड झटका; या लोकप्रिय प्लॅनमध्ये मोठा बदल

googlenewsNext

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने नुकतेच पाच प्रीपेड प्लॅन STVs बंद केले आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा सरकारी टेलिकॉम कंपनीने STV 395 चा प्लॅन आणला आहे. मात्र, यामध्ये अनलिमिटेड हा शब्दच काढून टाकला आहे. 


या प्लॅनमध्ये बीएसएनएल अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग बेनिफिट देत होती. तसेच 71 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा दिला जात होता. हा प्लॅन 31 ऑक्टोबरपर्यंच उपलब्ध होता. मात्र, १ नोव्हेंबरला हा प्लॅन बंद करण्यात आला. आता पुन्हा किंमत तेवढीच ठेवत नवीन लिमिट घालण्यात आली असून देशभरातील सर्कलमध्ये हा प्लॅन लागू करण्यात आला आहे. 


ग्राहकांनी जुना प्लॅन रिचार्ज केला असेल तर तो चालूच राहणार आहे. BSNL STV 395 नवीन बदल करण्यात आले आहेत. यानुसार 3000 ऑननेट म्हणजेच बीएसएनएल टू बीएसएनएल कॉलिंग मिनिट व 1800 ऑफ नेट म्हणजेच इतर नेटवर्कवर कॉलिंग करता येणार आहे. याशिवाय दिवसाला 250 मिनिट कॉलिंग करता येणार आहे. दिवसाचे किंवा महिन्याच्या लिमिटपेक्षा जास्त कॉल झाल्यास ग्राहकांना 20 पैसे प्रति मिनिटच्या हिशेबाने पैसे आकारले जाणार आहेत. 


सध्या टेलिकॉममध्ये तगडी स्पर्धा सुरु आहे. आयडिया, एअरटेलसारख्या खासगी कंपन्या कोणत्याही FUP लिमिटशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग ऑफर करत आहेत. रिलायन्स जिओने ऑफ नेट कॉलिंगच्या मिनिटांवर बंधने आणली आहेत. याद्वारे कंपनी ग्राहकाकडून 6 पैसे प्रति मिनिट आकारत आहे. 


बीएसएनएलच्या STV 395 सोबत 71 दिवसांसाठी 2 जीबी डेटा दररोज दिला जात आहे. हे नवीन STV 395 पॅक मुंबई आणि दिल्लीशिवाय देशभरातील टेलिकॉम सर्कलमध्ये लागू करण्यात आले आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये बीएसएनएलऐवजी एमटीएनएल सेवा पुरविते. तसेच राज्याबाहेरील ग्राहकांना एमटीएनएलचे नेटवर्क मुंबईत मिळते. यामुळे काही प्लॅन हे त्या नेटवर्कमध्ये काम करत नाहीत. 

ब्रॉडबँडसाठी 8 डिसेंबरपर्यंत ऑफर वैध

नव्या ऑफर अंतर्गत ग्राहक वर्क फ्रॉम होम ब्रॉडबँडअंतर्गत कंपनीचा प्लॅन विनामूल्य वापरू शकतात. यात युजर्सला 10 MBPSसह दररोज हाय स्पीड 5 जीबी डेटा मिळेल. कंपनीने म्हटले आहे की, ही ऑफर केवळ बीएसएनएलच्या लँडलाइन वापरकर्त्यांसाठी आहे, जे सध्या विनामूल्य ब्रॉडबँड कनेक्शनचा लाभ घेण्यास सक्षम असतील. कंपनीला आपल्या लँडलाइन वापरकर्त्यांचे ब्रँड प्लॅनमध्ये स्थलांतर करायचे आहे.
बीएसएनएलने मार्चमध्येच ही योजना सुरू केली. सुरुवातीला त्याची वैधता 19 एप्रिलपर्यंत होती, जी अनेक वेळा वाढविण्यात आली. आता ही ऑफर 8 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑफर अंतर्गत बीएसएनएल लँडलाइन वापरकर्त्यांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता मूलभूत ब्रॉडबँड कनेक्शन दिले जाईल. 8 डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडून कोणताही इंस्टॉलेशन चार्ज आकारला जात नाही. यात वापरकर्त्यांना 10 MBPSच्या वेगासह दररोज 5 जीबी डेटा देण्यात येणार आहे. मर्यादा संपल्यानंतर वेग 1 एमबीपीएसपर्यंत कमी होईल. ज्या लँडलाइन वापरकर्त्यांकडे कोणतेही सक्रिय ब्रॉडबँड कनेक्शन नाही ते ऑफरचा लाभ घेण्यास सक्षम असतील. वापरकर्त्यांना ही सुविधा केवळ 30 दिवसांसाठी विनामूल्य देण्यात येईल.

Web Title: BSNL's Unlimited Shock to Customers; Calling Limited made in STV 395

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.